राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम सोयगाव पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या प्रतिभा जाधव बिनविरोध
Summary
सोयगाव दि.26, सोयगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या प्रतिभा महेंद्र जाधव यांचा बिनविरोध विजय झाला. त्यामुळे सोयगाव तालुका पंचायत समितीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम राहिले आहेत. रुस्तुलबी पठाण यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नव्याने सभापती […]
सोयगाव दि.26, सोयगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या प्रतिभा महेंद्र जाधव यांचा बिनविरोध विजय झाला. त्यामुळे सोयगाव तालुका पंचायत समितीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम राहिले आहेत.
रुस्तुलबी पठाण यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नव्याने सभापती निवडीसाठी आज शुक्रवार ( दि.26 ) रोजी सोयगाव पंचायत समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. प्रारंभी भाजपच्या लता विकास राठोड यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. ऐनवेळी लता राठोड यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या प्रतिभा महेंद्र जाधव यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या सभापती पदाच्या निवडीकरिता आज दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.यावेळी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे , पंचायत समिती सदस्य रुस्तुलबी उस्मान खा पठाण, साहेबराव जंगलु गायकवाड , धरमसिंग दारासिंग चव्हाण,प्रतिभा जाधव, लता राठोड,संजीवन सोनवणे यांची उपस्थिती होती.
विजयाची घोषणा होताच शिवसेनेच्या वतीने पक्ष कार्यालय सेना भवन कार्यालय समोर जल्लोष करण्यात आला.
————————–
राज्यमंत्री अब्दुल यांच्या हस्ते सत्कार
दरम्यान शिवसेनेच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती प्रतिभा जाधव तसेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सुरेखाताई प्रभाकर काळे यांचा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
शहरातील शिवसेना पक्ष कार्यालय सेना भवन येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठाेड,तालुका प्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे,तालुका संघटक दिलीप मचे,शहर प्रमुख संताेष बाेडखे,शिवअप्पा चाेपडे,उस्मानखा पठाण, श्रीराम पाटील, राजमल पवार, अँड.याेगेश पाटील,राधेश्याम राठाेड,भगवान वारुने,रमेश गावंडे,दिलीप देसाई,गजु चाैधरी,माेतीराम पंडीत,कृष्णा गाेळेगावकर,सिताराम जामटीकर आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
———————————————-
महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मला सभापती पदासाठी संधी दिली या बद्दल आभार व्यक्त करीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून जनसामान्यांच्या योजना लाभार्थ्यांपर्यन्त पोहचविण्यासाठी मी सदैव तत्पर राहील अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सभापती प्रतिभा जाधव यांनी व्यक्त केली.
शेख चांद
प्रतिनिधी