राज्यपालांच्या हस्ते देशपांडे पंचांगाचे प्रकाशन
Summary
मुंबई, दि. 5 : पंचांगकर्ते गौरव रवींद्र देशपांडे यांनी तयार केलेल्या सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाच्या 10 व्या वार्षिक आवृत्तीचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचे अनावरण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. सूर्यसिद्धांत पंचांग गणित पद्धती ही भारतीय खगोलशास्त्राची अचूक अशी […]
मुंबई, दि. 5 : पंचांगकर्ते गौरव रवींद्र देशपांडे यांनी तयार केलेल्या सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाच्या 10 व्या वार्षिक आवृत्तीचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचे अनावरण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.
सूर्यसिद्धांत पंचांग गणित पद्धती ही भारतीय खगोलशास्त्राची अचूक अशी पंचांग निर्माण पद्धती असून मागील 60-70 वर्षांपासून या पद्धतीनुसार पंचांगनिर्मितीची परंपरा महाराष्ट्रात बंद पडली होती, ती मागील 10 वर्षांपासून महाराष्ट्रात पुन्हा सुरु केली आहे असे यावेळी संगणक अभियंता असलेल्या गौरव देशपांडे यांनी राज्यपालांना सांगितले.
या कार्यक्रमास गौरव देशपांडे यांचेबरोबर हेमांगी देशपांडे, सुरेखा देशपांडे व ऋतंभरा देशपांडे उपस्थित होते.