राज्यपालांकडून दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा

मुंबई, दि. १७ : राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला. कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी राज्यपालांपुढे विद्यापीठाच्या कामकाजाचे विस्तृत सादरीकरण केले.
विद्यापीठाच्या तीन वर्षातील शिक्षण, संशोधन व विस्तार सेवा क्षेत्रातील कार्य, ठाणे जिल्ह्यात शहरी शेतीला चालना, संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भरता, पशुधन विकास व मत्स्य पालन, शेतकऱ्यांचे समुपदेशन, नाविन्यपूर्ण विस्तार कार्यक्रम, उद्योग जगताशी सहकार्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, अंतर्वासिता कार्यक्रम, आदिवासी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविणे, वसतिगृह सुविधा, आदी विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
सादरीकरणाच्या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पी. सी. हालदवणेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
0000