राजुरा येथील पौनी 2 साखरी या गावालागत असलेल्या कोळसा खाणितील उतखन्नाचे काम हर्षा या नवीन कंपनी ला भेटले असून, लवकरच ते सुरु होणार

राजुरा येथील पौनी 2 साखरी या गावालागत असलेल्या कोळसा खाणितील उतखन्नाचे काम हर्षा या नवीन कंपनी ला भेटले असून, लवकरच ते सुरु होणार असल्याची माहिती प्राप्त होताच स्थानिक बेरोजगारांना शासन नियमानुसार 80% रोजगार देणे अनिवार्य आहे,आणि तो त्यांचा अधिकार सुद्धा आहे. असे असताना देखील प्रत्येक कंपनी आपले बाहेरचे कामगार सोबत घेऊन आणून स्थानिकांना डावलून शासन नियमावलीचे सर्रास उल्लंघन करून आपले काम करीत असते,या विषयाला घेऊन आज दिनांक 17 फरवरी रोजी शेकडो युवकांच्या ताफ्या सोबत जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरज भाऊ उपरे भिम आर्मी (भारत एकता मिशन) यांनी घटना स्थडी भेट दिली निवेदन दिले व कंपनीच्या अधिकाऱ्यां सोबत स्थानिक बेरोजगार यांना प्राध्यान्य देण्यात यावे अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल, ज्याची सर्वस्वी जवाबदारी कंपनीचे राहील अशी तंबी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे यांनी दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ग्वाही दिली कि सर्वात आधी आम्ही स्थानिकानाचं कामावर घेऊत, निवेदन देत असताना प्रामुख्याने सुंदर कस्तुरवार,अनिल चीलमुले, सुरज चाल,ज्ञानेश्वर गोखरे, सत्यपाल गोहोकर,संदीप चंद्रगिरीवार,रिझवान शेख,श्रीनिवास येलकोंडवर, वहाब शेख, आकाश ताकसांडे,नागेश कुमरे,रवी परचाके,विनोद चेनुरवार, भगवान आंबटवार इत्यादी उपस्थित होते