राजस्थान – मध्य प्रदेश-छत्तीगढ मधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष
Summary
कोंढाळी -दुर्गाप्रसाद पांडे भाजप युवा मोर्चाचे मंत्री निखिल जैस्वाल व जिल्हा कार्यकारिणी सदस्य बबलू भिसे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील नगर पंचायत कोंढाळी व लगतच्या भागात राजस्थानमधील मतदारांनी सत्ताधारी काँग्रेसऐवजी भाजपलाच बहुमत दिले. तर! मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान […]
कोंढाळी -दुर्गाप्रसाद पांडे
भाजप युवा मोर्चाचे मंत्री निखिल जैस्वाल व जिल्हा कार्यकारिणी सदस्य बबलू भिसे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील नगर पंचायत कोंढाळी व लगतच्या भागात राजस्थानमधील मतदारांनी सत्ताधारी काँग्रेसऐवजी भाजपलाच बहुमत दिले. तर! मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या लोककल्याणकारी योजनांचा विजय झाला. याशिवाय छत्तीसगड मधे ही एक हाती खेचून आणली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भा ज प अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांच्या झंझावातात अन्य पक्ष टिकाव धरू शकत नाही.या करिता भा ज पा युवा मोर्चा कडून विजयोत्सवा दरम्यान कोंढाळी मध्ये मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी भा ज पा ज्येष्ठ नेते शामराव तायवाडे,प्रमोद धारपुरे तथा धोतीवाडा -खापा के युवा मोर्चा के पदाधिकार्यांनी विजयोत्सव साजरा केला.
