नई दिल्ली महाराष्ट्र हेडलाइन

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Summary

नवी दिल्ली, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांची  जयंती  महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. […]

नवी दिल्ली, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांची  जयंती  महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी श्री. जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अतुलनीय कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, सहायक निवासी आयुक्त, डॉ राजेश आडपावार, स्मिता शेलार यांच्यासह  उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *