राजधानीत नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
Summary
नवी दिल्ली, २३ : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या […]
नवी दिल्ली, २३ : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्र
महाराष्ट्र परिचय केंद्रात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यालयातील उपस्थित अधिकारी, रसिक प्रकाशनाच्या श्रध्दा नांदुरकर, संस्कृती प्रकाशनचे सुनील मांडवे आणि पॉप्युलर प्रकाशनचे सचिन गुंजाळ यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
०००