राजकीय नेत्यांनी शाहनवाज शेख यांच्या कडून आदर्श आणि सामाजिक संवेदनशीलता शिकावी.
Summary
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि 23 एप्रिल 2021 आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी वैचारिकदृष्ट्या सामाजिक संवेदनशीलता., मानवतावादी मुल्ये असणे आवश्यक आहे. कोविड च्या या काळात कित्येक राजकीय नेते संवेदनशून्य झाले असल्याचे दिसून आले. त्या.. पुढाऱ्यांनी मुंबईतील शहानवाज शेख यांनी केलेल्या जनहिताच्या […]
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि 23 एप्रिल 2021
आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी वैचारिकदृष्ट्या सामाजिक संवेदनशीलता., मानवतावादी मुल्ये असणे आवश्यक आहे. कोविड च्या या काळात कित्येक राजकीय नेते संवेदनशून्य झाले असल्याचे दिसून आले. त्या.. पुढाऱ्यांनी मुंबईतील शहानवाज शेख यांनी केलेल्या जनहिताच्या कार्यातून शिकले पाहिजे. 22 लाखाची गाडी विकून रुग्णांना मोफत ऑक्सिजन पुरवणारा शहानवाज शेख मुंबई शहर..!
ऑक्सिजन मुळे लोकांचे जीव जात आहेत हे पाहिल्यानंतर स्वतःची फोर्ड एण्डीव्हर विकून गरजूंना मोफत ऑक्सिजन सिलेंडरची मदत करणं सुरू केलं.लॉकडाऊन मध्ये त्याच फोर्ड एण्डीव्हरचा वापर झोपडपट्टीतील गोरगरिबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी करत असल्याचं शहानवाज सांगतो, कारण गरिबांना त्या कठीण काळात साधनं उपलब्ध करणं अशक्य असायचं. शहानवाजने गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासून हे जनतेला आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू केले .कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास सहा हजार गरजूंना शहानवाज शेख यांनी ऑक्सिजन सिलेंडरची मदत केली. आत्ताच्या दुसऱ्या लाटेत आत्तापर्यंत जवळपास सहाशे रुग्णांची मदत केल्याचं शहानवाजने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. लोकांच्या मदतीसाठी एक वॉर रूम बनवली आहे, आणि त्यातून गरजूंना 24 तास सेवा त्यामध्ये दिली जाते. शहानवाज म्हणतो , “एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी गाडी विकणे काही कठीण नाही,भविष्यात अजून अश्या चार गाड्या घेऊ शकतो.रुग्णांचे जीव वाचवणं महत्वाचे आहे!” अश्या कठीण काळात स्वतःच सर्वस्व झोकून देऊन अडचणीत आलेल्या लोकांच्या मदतीसाठी उभं राहण्याऱ्या “ऑक्सिजन मॅन”
शहानवाज शेख (मुंबई शहर) यांना सलाम! माणुसकी, सामाजिक जाणीव, सामजिक संवेदनशील सदैव बाळगून सेवा उपलब्ध करून देणे हाच मानव धर्म असल्याचे शेख यांनी सांगितले.