रस्ता अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली कुटुंबातील सदस्यांना हेल्मेट वाटप

कोंढाळी -वार्ताहर
१९ नव्हेंबर रोजी महामार्ग सुरक्षा पोलीस. केंद्र, खुर्सापार येथे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) रवींद्र सिंगल, पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, सा. म पो प्रा वि नागपूर तसेच पो.नि. रवींद्र दुबे यांचे मार्गदर्शनात रस्ते अपघातातील पिडीतांच्या स्मरणार्थ जागतिक स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यात
1) दिवसभर गर्दीच्या ठिकाणी तसेच शाळा, पेट्रोल पंप, बसस्टाप इत्यादी परिसरात रस्ते अपघातासंबधी जनजागृतीपर प्रबोधन घेऊन पाॅम्प्लेट लावण्यात आले.
2) संध्याकाळी 06:00 वा जागतिक स्मरण दिनानिमित्त या वर्षी रस्ते अपघातात मृत पावलेले 1) योगेश पंढरी भलावी, वय 23 वर्ष, 2) साहेबराव नामदेव नेहारे, वय 50 वर्षे दोन्ही रा. खुर्सापार, ता. काटोल 3) दिलीप हालाजी चरडे, वय 50 वर्षे, रा. कोंढाळी यांचे घरी जाऊन त्यांचे फोटोला हार व पुष्पगुच्छ अर्पण करुन श्रद्धांजली देण्यात आली तसेच त्याच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यात येऊन योग्य मदतीकरिता मार्गदर्शन करण्यात आले.
3) संध्या 07:00 वा ते 08:30 वा दरम्यान NH53 वरील कोंढाळी या नगरातील मुख्य चौकात मागील वर्षभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमांपैकी आजुबाजुच्या परिसरातील मृतकांचे परीवारातील आई-वडील, भाऊ बहीण यांना बोलावून तसेच गावातील नागरिक, पत्रकार, चालक संघटनेचे पदाधिकारी, मृत्युंजय दुत, स्थानिक पोलीस स्टाॅफ यांना आमंत्रित करून कॅंडल मार्च काढून मृतक परवारातर्फे दीप प्रज्वलन करण्यात आले व मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच स.पो.नि. मेश्राम व अपघातासंबधी जनजागृती करणारी संस्था *जीवन सुरक्षा प्रकल्प* या संस्थेचे संचालक डॉ राज दिवाण यांनी रस्ते अपघात व वाहतूक नियमांबाबत कोंढाळी येथील कोंढाळी -वर्धा टी पांईट वर माहिती देऊन जनजागृती करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
4) रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेले 1) योगेश पंढरी भलावी, वय 23 वर्ष, 2) साहेबराव नामदेव नेहारे, वय 50 वर्षे या दोन्ही इसमांचा हेल्मेट न वापरल्याने मृत्यू झाल्याने अनुक्रमे त्यांचा भाऊ भागवत पंढरी भलावी व मुलगा चेतन साहेबराव नेहारे यांना हेल्मेट भेट देऊन उपस्थित नागरिकांना हेल्मेटचे महत्त्व विशद करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला स.पो.नि तेजेंद्र मेश्राम, पो.उप.नि. नांदगाये, पो.उप.नि. भिलावे, पोलीस अंमलदार मोरे, धवड, केंद्रे, सोमकुंवर, मनोहर तसेच जीवन सुरक्षा प्रकल्प या संस्थेचे मा. डॉ राज दिवाण, सुरेंद्र भाजीखाये,चंद्रशेखर चरडे, संजय गायकवाड सह त्यांचे सहकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, चालक संघटनेचे पदाधिकारी, मृत्युंजय दुत असे मिळून सेकडो नागरिक उपस्थित होते.