रमाई आश्रमशाळेत करिअर मार्गदर्शन एकदिवसीय कार्यशाळा संपन्न …………………………………….
Summary
………………………………….. नेर- अलीकडे स्पर्धेच्या युगात आदिवासी विद्यार्थी मागे पडला असून उच्च शिक्षणाच्या अभावामुळे सर्वच क्षेत्रामध्ये आदिवासी उमेदवार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आदिवासी कुटुंबे व समाजाचे नुकसान होतांना दिसत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी […]

…………………………………..
नेर- अलीकडे स्पर्धेच्या युगात आदिवासी विद्यार्थी मागे पडला असून उच्च शिक्षणाच्या अभावामुळे सर्वच क्षेत्रामध्ये आदिवासी उमेदवार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आदिवासी कुटुंबे व समाजाचे नुकसान होतांना दिसत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी व उच्च शिक्षणातून विविध नौकरी व व्यवसायाला चालना देण्यासाठी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद जि.यवतमाळ व एकलव्य इंडिया फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने रमाई आदिवासी आश्रमशाळा बाणगांव येथे “एक दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचे उदघाटन रमाई आश्रमशाळेचे प्राचार्य वसंत क्षीरसागर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत इयत्ता ११वी ,१२वी (कला,विज्ञान )शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकलव्य इंडिया फाउंडेशनचे तज्ञ मार्गदर्शक संदेश राठोड, नेहा नाफडे, श्रृती डांगे, सुशील जाधव आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना इयत्ता बारावी नंतर विद्यार्थ्यांनी कुठली वाट निवडावी याबाबत सखोल मार्गदर्शन करतांना असे सांगितले आहे की, समाजकार्य, माहिती व तंत्रज्ञान, कृषी, व्यावसायिक शिक्षण, कायदे विषयक शिक्षण, राजकीय शिक्षण,कला शिक्षण,अभिनय इत्यादी क्षेत्रांत करिअर घडवण्यासाठी एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने विविध राज्य व देशपातळीवरील नामांकित महाविद्यालय व विद्यापीठात विनामूल्य प्रवेश घेऊन करिअर निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
प्राचार्य वसंत क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, बारावी नंतर आदिवासी उच्च शिक्षण न घेता जीवनाचे नुकसान करतात.त्यामुळे नौकरीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहतात.म्हणूनच विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करून करिअर निवडावे.
कार्यशाळेचे संचालन प्रा.रोशनी मेश्राम, प्रास्ताविक प्रा.तुषार मानीकपूरे, आभार प्रा.लक्ष्मिकांत शतपलकर यांनी केले.यावेळी प्रा.प्रकाश इंगळे,प्रा.सुनिल कांबळे,प्रा.विलास कवाने उपस्थित होते.
निलेश राठोड (कारभारी)
जिल्हा यवतमाळ अमरावती न्युज रिपोर्टर
पोलीस यौध्दा
7038018111/9552706572