युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूरचा नवा उपक्रम “आधी गावकऱ्यांच्या समस्यांचे निवारण नंतर शाखा
चंद्रपूर : आज दि.२८/०२/२०२१ ला “आधी गावकऱ्यांचा समस्यांचे निवारण नंतर शाखा याच संकल्पनेतून” इरई ता. कोरपना या गावी युवा स्वाभिमान पार्टी च्या शाखेचे उदघाट्न मा. जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरेयांच्या उपस्थितीत करण्यात आले.
काही महिन्या पूर्वी इरई या गावी जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे आले असता गावकर्यांनी समस्यांचा पाढाच वाचून दाखवला होता. त्यावेळेस गावातील एक एक समस्या नक्कीच मार्गी लावू असा शब्द सुरज ठाकरे यांनी दिला व तो पूर्ण देखील केला.
सर्वप्रथम जे गावकरी एस टी महामंडळ च्या सेवेपासून आत्तापर्यंत वंचित होते ज्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर गावी शाळेत येण्याजाण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागत होता. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरज ठाकरे यांनी हस्तक्षेप/ पाठपुरावा करून गावगाऱ्याना बस सेवेचा लाभ मिळवून दिला. व गावातील विद्यार्थ्यांना बस पासेस करिता सहकार्यांना सांगून पास सुद्धा बनवून दिले.
IMG-20210228-WA0057
अशाप्रकारे गावकऱ्यांचा छोट्या -मोठ्या समस्या सुरजभाऊ ठाकरे स्वतः हस्तक्षेप करून मार्गी लावत असल्यामुळे त्यांच्या याच कामाशी प्रेरीत होऊन आज गावकऱ्यांनी इरई येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या शाखेचे उद्घाटन केले. व इरई या गावासह आजूबाजूच्या ईतरही गावातील रस्त्यासह ईतरही समस्या लवकरच मार्गी लावणार असा शब्द गावकर्यांना यावेळेस जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी दिला.
फक्त निवळणुकीपुरतं पक्षाचे दुपट्टे गड्यात घालून व हातात झेंडे घेऊन गावाचा विकास होत नाही तर ज्याला गावातील समस्यांची तळमळ असते तोच वेक्ती रोटी-बोटी व पैश्याच्या आहारी न जाता जो वेक्ती आमदार, खासदार व कुठलेही मंत्रीपद नसताना देखील जनतेच्या समस्या वेळोवेळी लावण्यास हस्तक्षेप करतो तो खरा विकासपुरुष असतो व हे सुरजभाऊ ठाकरे यांनी आपल्या कामातून सिद्ध केले. व आधी गावकऱ्यांच्या समस्यांचे निवारण नंतर शाखा ही संकल्पना आजपासून इरई या गावातून सुरुवात केली. यावेळेस सर्कल अध्यक्ष निखिल पिदूरकर, शाखा अध्यक्ष बाळकृष्ण भोयर, शाखाप्रमुख सुनील तेलंग, शाखा उपाध्यक्ष प्रथम तेलंग व समस्त आदी गावकरी उपस्थित होते.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर