BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

युवा भोयर पवार मंच च्या ” वार्षिक महोत्सव – २०२४ ” चे कोंढाळी येथे भव्य आयोजन भोयरी भाषा प्रचार, समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला, वैद्यकीय सेवा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ

Summary

दुर्गा प्रसाद पांडे: कोंढाळी- युवा भोयर पवार मंच, नागपूर शाखा कोंढाळीच्या वतीने रविवार दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत १७ व्या ” वार्षिक महोत्सव २०२४ ” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे ‌. या वार्षिक […]

दुर्गा प्रसाद पांडे:
कोंढाळी-
युवा भोयर पवार मंच, नागपूर शाखा कोंढाळीच्या वतीने रविवार दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत १७ व्या ” वार्षिक महोत्सव २०२४ ” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे ‌. या वार्षिक महोत्सवात भोयर पवार समाजातील विशेष कामगिरी करणारे, शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व युवकांचा सत्कार , सोबतच समाजातील गरजू व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात शिष्यवृत्ती प्रदान करणे , सोबतच इनक्रेडिबल युवा 2024 वार्षिक अंकांचे विमोचन करणे व या प्रसंगी समाजरत्न तसेच सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, राजकीय, तसेच भोईरी भाषा प्रचारक व साहित्यिक यांचा सत्कार करणे ,या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय भोयर पवार महासंघ नागपूरचे अध्यक्ष- डॉ. नामदेवराव राऊत ,उद्घाटक- श्रीक्षेत्र सती अनुसया माता देवस्थानचे अध्यक्ष व काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांचे सल्लागार मा. सुधीर दिवे यांचे प्रमुख उपस्थितीत व वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. सरीताताई गाकरे, मध्यप्रदेश महू इंदोर येथील भोयर पवार संघाचे अध्यक्ष सुनील बोबडे, पृथ्वीराज रहांगडाले ,कृष्णकुमार डोबले, जियालाल शरणागत, नामदेवराव बोबडे, श्रावण फरकाडे यांचे विशेष उपस्थितीत हा महोत्सव नागपूर जिल्ह्याचे काटोल तालुक्याच्या कोंढाळी येथील पाचबुधे सभागृहात रविवार ४ आगस्ट २०२४ ला सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ‌.याप्रसंगी समाजरत्न सुरेश देशमुख, प्राध्यापक भगवान बन्नगरे, डॉ. दिपक चौधरी, कु. अंजली मोहन मुन्ने, वसंतराव खवसे, प्रतीक्षा लक्ष्मीकांत बैंगणे, डॉ. महेंद्र घागरे, अशोक पाठे, डॉ. पल्लवी मधुसूदन डोबले , डॉ. तीर्थानंदन बन्नगरे, पुरुषोत्तम कालभूत, भगवान बोवाडे, गुणवंतराव मानमोडे ,सौ. लताताई धारपुरे, सौ. रंजू प्रकाश बारंगे, पंकज खवसे , हरीभजन बिरगडे यांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमा/दरम्यान डॉ. जयश्री चौधरी (बारंगे), डॉ. उदय विठ्ठलराव चौधरी, यांचे रुग्णालयातर्फे उपस्थितांचे निशुल्क आरोग्य तपासणी तसेच रेनबो रक्तपेढी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा भोयर पवार मंच, नागपूरचे अध्यक्ष श्रावण फरकाडे, संरक्षक सुरेश देशमुख, प्रेमराज गोहते, कोंढाळी शाखेचे अध्यक्ष मनोज गोरे, रवींद्र किनकर, निलेश फरकाडे, चंद्रशेखर डोंगरे, गजेंद्र डोंगरे, गोलू बोवाडे, राजू धोटे ,कमलेश चोपडे यांनी कोंढाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली .या कार्यक्रमाला समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा भोयर पवार मंच तर्फे करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *