युवकांनो जागृत व्हा..स्वाभिमानी बना….. 1 जानेवारी जवळ येत आहे.
🤗🙏युवकांनो जागृत व्हा..स्वाभिमानी बना….. 1 जानेवारी जवळ येत आहे.
काही लोकांची आता फेसबुकवर, व्हाट्सअप्प वर भिमा कोरेगाव शौर्याचे मॅसेज फिरणार.…
मोठ्या थाटाने लोकांना सांगत मिरवणार कि, तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही…. आमचा इतिहास म्हणजे भिमा कोरेगाव चा..!
500 महार सैनिकांनी 28000 पेशवाईंच्या सैन्याला हरवलं आणि बाजीराव पेशवा द्वितीय वर विजय मिळवला.
तो दिवस म्हणजे… आमच्या शौर्याचा दिवस..!
अरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा दरवर्षी भिमा कोरेगाव च्या विजय स्तंभाला अभिवादन करायला जात असत. आणि आम्ही सुद्धा दरवर्षी नित्य नेमाने विजय स्तंभाला अभिवादन करायला न चुकता जात असतो. जाणे नाहीच जमलं तर फेसबुक वर, व्हाट्सअप्प वर शुभेच्छा देऊन मोकळे होत असतो.
तुम्हाला माहित नाही आमची ताकद.!
जरी बाबासाहेबांनी आम्हाला आमच्या हातात लेखणी दिली असेल आणि म्हणून आम्ही सध्या आमच्या हातातल्या तलवारी सोडल्या असतील पण आम्ही अजून तलवारी चालवणं विसरलो नाही. बोट दाखवाल तर हात कापून टाकेन. आम्ही अजून आमचा इतिहास विसरलो नाहीये… आणि अजून अशा अनेक भाष्य करणाऱ्या पोस्टी लवकरच काही दिवसांत वाचायला मिळतील ह्यात शंका नाही.
अरे मित्रांनो ( स्त्री – पुरुष ),
आम्ही आमचा इतिहास मोठ्या अभिमानाने, स्वाभिमानाने सांगतो तर खरे.. पण त्यातून आपण खरंच शिकवण घेतलीय काय?
बाबासाहेब शौर्य दिनाबाबत त्या विजय स्तंभाला अभिवादन करायचेत पण अभिवादन करतांना काय विचार करत असतील बरे???
आम्ही खरंच आजपर्यंत ह्या दिनाबद्दल काय चिंतन केलं असेल?
आम्ही खरंच समजून घेतलं असेल का?
तुम्हाला माहित आहेच कि 500 महार सैनिकांनी 28000 पेशवाईंच्या सैन्यांना चित केलं! त्यांना हरवलं!
पण खरंतर महार सैनिक इंग्रजांच्या सैन्यात जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी नाही लढले तर ते स्वाभिमानासाठी लढले. ती एक संधी होती अस्पृश्यांसाठी .. पेशवाईंकडुन अस्पृश्यांवर झालेल्या अन्याय, अत्याचार विरुद्ध लढण्याची संधी होती ती..!
आणि आम्ही कमजोर नाही आहोत…
आम्ही जनावर नाही आहोत..
आम्ही सुद्धा तुमच्यासारखीच माणसं आहोत आणि आम्हाला सुद्धा मानवीय जीवन जगण्याचा अधिकार आहे हे सांगण्याची संधी होती..!
आणि म्हणूनच ह्यासाठी आपापसातील अंतर्गत वाद बाजूला ठेवून 500 लोकं लढण्यासाठी एकत्र आलीत आणि सगळ्यांनी एकंच ध्येय, उद्दिष्ट मनाशी, उराशी बाळगलं आणि ते लढलेत…
अन्याया विरुद्ध..!
अत्याचाराविरुद्ध.!
स्वाभिमानासाठी..!
स्वसन्मानासाठी..!
माणूसपणासाठी..!
पेशवाईंच्या अमानवीय व्यवहारांविरुद्ध.!
आणि ह्याच एकीला…
500 सैनिकांच्या एकंच ध्येय उद्दिष्टाला..
त्यांच्या धाडसाला…
त्यांच्या शौर्याला..
त्यांच्यातील एकत्रित लढाऊ वृत्तीला..
आणि त्यातून त्यांना मिळालेल्या विजयाला…
कदाचित बाबासाहेब 1 जानेवारीला भिमा कोरेगावच्या विजय स्तंभाला अभिवादन करत असतील.!
परंतु आज वेळ आहे आम्हाला ह्यातून नेमकी शिकवण घ्यायची.!
आज आमच्यात जरी अनेक निरनिराळ्या विषयांवर काम करणाऱ्या अनेक आंबेडकरी सामाजिक संघटना असल्या तरी आम्हाला आमच्यात असलेले अंतर्गत वाद बाजूला ठेवावेच लागतील आणि त्या भिमा कोरेगावच्या लढाईत 28000 पेशवाईंच्या सैन्यांविरुद्ध लढणाऱ्या 500 महार सैनिकांसारखं आम्हाला समान ध्येय उद्दिष्टपूर्ती साध्य करणाच्या प्रमाणेच एकत्र येऊन एकमेकांवर कुरघोड्या करणं बंद करावं लागणार आणि पेशवाईंप्रमाणेच आमच्या समोर असलेल्या उघड शत्रूंवर तुटून पडावं लागेल त्यांच्या विरुद्ध आम्हाला संवैधानिक पद्धतीने लढावंच लागेल.! तरच तुम्हाला तुमचे ध्येय उद्दिष्ट प्राप्त करता येईल अन्यथा बाबासाहेबांनी पुढे आणलेला रथ आम्हीच मागे आणू… त्यासाठी आम्हाला शत्रूंची गरज भासणार नाही हे तेवढंच सत्य आहे.👍
तेव्हा एकत्र या… आणि उघड शत्रूवर विजय प्राप्त करा.!
खरंतर हे विजय पराजय पर्यंत मर्यादित न राहता निरंतर चालणारी प्रक्रिया बनली पाहिजे!👍
– जयभीमच जयभारत जयसंविधान 🙏👍