म.ग्रा.रो.ह.योजना अंतर्गत सिंचन विहिर, गुरांचे गोठे, शेळी शेड व इतर वैयक्तिक लाभाचे प्रलंबित अनुदान लवकरच मिळणार – आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे

तुमसर:- म.ग्रा.रो.ह.योजना अंतर्गत बरेच वैयक्तिक लाभाच्या योजने चे कामे केली जातात. त्यांचा फायदा लाभार्थी यांना व्हावा करीता शासना मार्फ़त बऱ्याच योजना राबविले जातात. त्यात सिंचन विहिर, गुरांचे गोठे, शेळी शेड व इतर वैयक्तिक कामे आपल्या तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. परंतु बऱ्याच दिवसा पासून त्याचे अनुदान मिळालेला नाही.मागील काही दिवसा पूर्वी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनीं आपल्या तुमसर मोहाड़ी दोन्ही तालुक्यामंध्ये आमसभा घेतली होती व त्या आमसभा मंध्ये लोकांची आरडा ओरड फार मोठ्या प्रमाणात होती की आम्ही बऱ्याच दिवसा पासून सिंचन विहिर, गुरांचे गोठे, शेळी शेड व इतर वैयक्तिक लाभाचे कामे पूर्ण केली आहे परंतु अजुन पर्यंत त्याचे रूपये मिळाले नाही. त्यांची दखल घेत आमदार महोदय यांनी *रोजगार हमी योजने चे मंत्री महोदय मा.ना.श्री.भरत शेठ गोगावले* यांच्या कड़े त्या सन्दर्भात पाठपुरावा केला असून याची दखल सुद्धा तत्काल घेण्यात आली.आता लवकरच लाभार्थीच्या खाता मंध्ये अनुदान जमा होणार अशी माहिती आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी दिले आहे.