क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

मोहाडी परिसरात रेतीचोरीवर कारवाई; विना परवाना रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

Summary

मोहाडी | प्रतिनिधी मोहाडी तालुक्यातील ढोरवाडा परिसरात अवैध रेती वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला असून, महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत एक ब्रास रेतीसह ट्रॅक्टर जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. […]

मोहाडी | प्रतिनिधी
मोहाडी तालुक्यातील ढोरवाडा परिसरात अवैध रेती वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला असून, महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत एक ब्रास रेतीसह ट्रॅक्टर जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
प्रकरणानुसार, ग्राम महसूल अधिकारी आशिष ए. कोकोडे (वय ३४, रा. तुमसर) हे आपल्या कर्तव्यावर असताना दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजता मौजा ढोरवाडा (तह. मोहाडी) परिसरात तपासणी करीत होते. यावेळी आरोपी भुपेंद्र गुलाब ढबाले (वय ३५, रा. चारगाव, ता. तुमसर) हा विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे एक ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आला.
तपासणीदरम्यान आरोपीकडे रेती वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना आढळून न आल्याने, संबंधित ट्रॅक्टर (अंदाजे किंमत ₹५,५०,०००) व त्यातील एक ब्रास रेती (किंमत ₹६,०००) असा एकूण ₹५,५६,००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महसुली कारवाईनंतर तहसीलदारांच्या आदेशानुसार फौजदारी कारवाईसाठी प्रकरण पोलीस स्टेशन मोहाडी येथे दाखल करण्यात आले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन मोहाडी येथे आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक १५/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम 48 (7), (8) व पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे कलम 7, 9 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पो.हवा. दुर्योधन भुरे (पो.स्टे. मोहाडी) करीत असून, परिसरात वाढत चाललेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *