क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

मोहाडी तहसीलमध्ये अमली पदार्थांचे सेवन वाढले: तरुण पिढी धोक्यात

Summary

प्रतिनिधी / मोहाडी मोहाडी तहसील परिसरात अलीकडच्या काळात अमली पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. अफू, गांजा, एमडी, ब्राऊन शुगर यांसारखे घातक अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असून, त्याचा सर्वाधिक फटका शालेय व महाविद्यालयीन तरुणांवर […]

प्रतिनिधी / मोहाडी

मोहाडी तहसील परिसरात अलीकडच्या काळात अमली पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. अफू, गांजा, एमडी, ब्राऊन शुगर यांसारखे घातक अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असून, त्याचा सर्वाधिक फटका शालेय व महाविद्यालयीन तरुणांवर पडत आहे. अनेक युवक या व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याने त्यांच्या आयुष्याचा अक्षरशः विनाश होताना दिसत आहे.

पोलीस प्रशासनाची निष्क्रियता चिंताजनक

अमली पदार्थ विक्री व सेवनावर नियंत्रण ठेवणे ही पोलिसांची जबाबदारी असली तरी या बाबतीत पोलिस प्रशासन पुरेसा कस लागलेला दिसत नाही. केवळ किरकोळ स्वरूपात कारवाया करण्यात येत आहेत. अमली पदार्थ विक्रेत्यांचे रॅकेट मोडून काढण्याच्या दृष्टीने कुठलीही ठोस मोहीम राबवली जात नसल्याचे दिसून येते. परिणामी, मोहाडी तहसीलमध्ये या व्यसनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे.

पालक आणि समाजाची भूमिका महत्त्वाची

या धोकादायक परिस्थितीत फक्त पोलिसांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही. पालकांनी आपल्या पाल्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनावर सतत लक्ष ठेवून मार्गदर्शन करावे. व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस विभागाने संयुक्तरित्या विशेष मोहिमा राबवणे अत्यंत आवश्यक आहे.

तरुणाईचे भविष्य वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत

नशेच्या आहारी गेलेली तरुणाई गुन्हेगारी मार्गाकडे वळते आहे. चोरी, मारहाण, घरफोडी, अगदी आत्महत्या यासारख्या घटना वाढत आहेत. काही भागांमध्ये अंधारात ‘नशेच्या पार्टी’ घेतल्या जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे मोहाडी तहसीलमध्ये सामाजिक सलोखा, कायदा-सुव्यवस्था आणि तरुणांचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने कठोर पावले उचलावीत, हीच अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *