BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आम आदमी पार्टीचा काटोल येथे सत्याग्रह

Summary

(काटोल) दिनांक १६/०४/२०२३ सीबीआयने रविवार, १६ एप्रिल रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवले असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टी तर्फे राज्यभर सत्याग्रह करण्यात आला. तथाकथित एक्साईज घोटाळ्याच्या चौकशीसाठी यापूर्वीच सत्येंद्र जैन यांना ताब्यात घेतलेले असताना आता […]

(काटोल) दिनांक १६/०४/२०२३

सीबीआयने रविवार, १६ एप्रिल रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवले असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टी तर्फे राज्यभर सत्याग्रह करण्यात आला. तथाकथित एक्साईज घोटाळ्याच्या चौकशीसाठी यापूर्वीच सत्येंद्र जैन यांना ताब्यात घेतलेले असताना आता अरविंद केजरीवाल यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलेले असल्यामुळे त्याच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी आजचे युवा आघाडी नागपूर जिल्हा अध्यक्ष वृषभ वानखेडे यांच्या नेतृत्वात काटोल येथे सत्याग्रह करण्यात आला.

दिल्लीतील जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण आरोग्य तसेच मोफत वीज पाणी व महिलांना मोफत प्रवास देण्याचं काम अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेले असल्यामुळे त्यांच्या मॉडेलला मोठ्या प्रमाणात जन मान्यता मिळत आहे. यापूर्वीच जगभर त्यांच्या कामाची स्तुती होत आहे. आता राष्ट्रीय पक्ष बनलेला आप देशभर वेगाने पसरत आहे त्यामुळेच मोदी सरकार आम आदमी पार्टीला अडचणीत आणण्याचे सर्व प्रयत्न करीत आहे असे यावेळेस नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख सुनीलदादा वडस्कर यांनी सांगितले.

दिल्ली विधानसभेमध्ये केजरीवाल यांनी अदानी आणि मोदी यांच्या संदर्भाने अनेक आरोप केले होते. मोदी यांच्यात काळ्या पैशाची गुंतवणूक अदानी यांच्या कंपन्यांमध्ये असल्याचा थेट आरोप केजरीवाल यांनी केला होता. तेव्हापासूनच अदानी यांना वाचवण्यासाठी केजरीवाल यांच्या विरोधात कट कारस्थान रचले जात होते, असा आरोप आपचे वृषभ वानखेडे यांनी यावेळेस केला.

मोदी सरकार तपासयंत्रणा आणि न्याययंत्रणा या दोघांच्या मदतीने त्यांच्या विरोधातील आवाज दडपण्याचं काम करीत आहे. ज्या मद्यअबकारी धोरणाचा संदर्भ घेतला जात आहे, तेच मद्य विक्री धोरण पंजाब मध्ये जसेच्या तसे लागू करण्यात आलेले असून तेथे तब्बल ४० टक्क्याहून अधिक उत्पन्न वाढले आहे. या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणा अनेकांवरती दबाव आणून त्यांना हवी तशी साक्ष देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. अबकारी धोरण हे निमित्तमात्र असून मोदी सरकारला केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची धास्ती वाटत असल्यानेच हे दडपशाहीचे धोरण राबवले जात आहे. ही अघोषित आणीबाणीच आहे. त्याच्या विरोधात आणि सत्याच्या बाजूने आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल असे वृषभ वानखेडे यांनी म्हटले.

आजच्या काटोल येथील आंदोलनात सुनीलदादा वडस्कर, अविनाश अटकळे, शेखर खरपूरीया, रोशनीताई बाजनघाटे, मंगेश टेकाडे, निलेश पेठे, निलेश वाघे, धनराज तुमडाम, दुर्गेश चौधरी, आकाश रंगारी, हरीश पेंदाम, नंदू बखाले, अरविंद बाविस्कर, गिरीश शेंडे, कृष्णा ठाकरे, कुणाल परतेती, आदित्य अंबुडारे, योगेश काळे, ऋषिकेश वानखेडे, श्रविल मोहतकर, नाना मडके, नरेश येणुरक, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सामील झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *