मोतीराम कंगाली ची जयंती गोंडी भाषा दिनाने थाटात साजरी
मोतीराम कंगाली ची जयंती गोंडी भाषा दिनाने थाटात साजरी
कन्हान : – बिरसा ब्रिगेड कन्हान व्दारे शहरात गोंडी धर्माचार्य मोतीराम कंगाली यांची जयंती गोंडी भाषा दिन म्हणुन थाटात साजरी करण्यात आली.
गोंडीयन संस्कृती भाषा व इतिहासकार मोती रावन कंगाली साहेब यांनी आपले जीवन आदिवासी गोंडी सभ्यता व प्रचाराकरिता अर्पण केले. त्याच्या अथक प्रयत्नाने आज गोंडी लिपी, भाषा व संस्कृती चा प्रचार प्रसार होत आहे. त्यांनी कित्येक पुस्तके लिह लीत ज्यात आदिवासी गोंडी सभ्यताची ओळख व्हाय ला मदत झाली. ते पहिले व्यकती होते की, मोहजोद डो सारखी लिपी पुर्णत: वाचली होती. त्यांना गोंडी धर्माचार्य म्हणुन संबोधिले जाते. यामुळेच आदिवासी समाज (दि.२) फेब्रुवारी ला त्यांची जयंती गोंडी भाषा दिन म्हणुन साजरी करतात. यास्तव बुधवार (दि.२) फेब्रुवारी २०२२ ला कन्हान शहरात बिरसा ब्रिगेड कन्हान व्दारे मोती रावन कंगाली यांची जयंती गोंडी भाषा दिनाने साजरी करण्यात आली. यावेळी गोंडी भाषा दिना निमित्य सोनुजी मसराम हयानी उपस्थिता ना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बंदुजी इडपाची, अनंत टेकाम, पप्पुजी धारे, शंकर इनवाते प्रामुख्याने उपस्थि त होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार संदीप परते यांनी केले. कार्यक्रमास आदीवासी समाज बांधव बहु संख्येने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
9579998535
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क