मोढा बुद्रुक गाव – आधारबन वाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.11, मोढा बुद्रुक – आधारबन वाडी – मंगरूळ रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागाला दिले आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतीच मोढा बुद्रुक गावाला भेट देत सदरील रस्त्याच्या कामाची पाहणी केली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, राजेंद्र ठोंबरे, आर. एस. पवार यांच्यासह सरपंच रामेश्वर सोनवणे, उपसरपंच दीपक हावळे, संभाजी हावळे, समाधान साळवे, सोसायटी चेअरमन राहुल सुरडकर, माजी सरपंच अशोक सुरडकर, राजू महाकाळ, तंटामुक्ती अध्यक्ष निवास महाकाळ, आदिंची उपस्थिती होती.
मोढा गाव ते आधारबन वाडी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सदरील रस्ता हा मोढा गाव ते आधारबन वाडी तसेच पुढे रजाळवाडी, (सिल्लोड ) व त्यांनतर मंगरूळ कडे जातो. अनेक लोक या रस्त्याने राहतात. या रस्त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे बरेच अंतर कमी होणार असून पावसाळ्यात होणाऱ्या समस्येला आळा बसणार आहे. या रस्त्याचे बरेच काम झालेले आहेत तर राहिलेले काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना ना. अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिल्या. तसेच सदरील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन झालेले अतिक्रमण ,टाकाऊ साहित्य, झाडे , झुडपे काढण्यास सहकार्य करावे असे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केले.
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड
प्रतिनिधी
शेख चांद