क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

मोडघाटा सर्व्हिस रोडवर रात्रीची ‘रेती कारवाई’ साकोली पोलिसांचा डाव – सरकारी वाळूची चोरटी वाहतूक उघड, ७.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Summary

साकोली – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मोडघाटा सर्व्हिस रोडवर रेती तस्करीचा डाव अखेर पोलिसांच्या रडारवर आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या कारवाईत सरकारी मालकीची वाळू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर झडप टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घटना १८ डिसेंबर […]

साकोली – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मोडघाटा सर्व्हिस रोडवर रेती तस्करीचा डाव अखेर पोलिसांच्या रडारवर आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या कारवाईत सरकारी मालकीची वाळू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर झडप टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
घटना १८ डिसेंबर रात्री ८ वाजता ते ९ वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी पोहवा विजय राउत (वय ४८) यांच्या नेतृत्वाखालील टीम महामार्ग परिसरात ​​पेट्रोलिंग करीत असताना लाल रंगाचा माहिंद्रा २७५ मॉडेल ट्रॅक्टर आणि त्यास जोडलेली ट्रॉली संशयास्पदरीत्या थांबलेली आढळली. चालकाकडे वाहतुकीचा परवाना विचारला असता तो सादर न करता पळवाट काढू पाहिला.
पथकाने त्वरेने वाहन रोखून पाहणी केली असता ट्रॉलीमध्ये सुमारे १ ब्रास सरकारी रेती असल्याचे स्पष्ट झाले. मूल्यांकन करता, रेती किंमत ६,००० रुपये आणि ट्रॅक्टर–ट्रॉलीची बाजार किंमत सुमारे ७ लाख रुपये असल्याचे समोर आले.
या प्रकरणी ताब्यात घेतलेले आरोपी –
• प्रशांत चेटुले (३९), चालक, रा. बाम्हणी (मुंडीपार)
• रामेश्वर निंबार्ते (अंदाजे ५३), मालक, रा. मुंडीपार
हे दोघेही विनापरवाना गौण खनिजाची चोरी करून वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर कलम ३०३(२), ४९ भा.न्या.सं. अनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जप्तीमध्ये –
• लाल रंगाचा माहिंद्रा २७५ ट्रॅक्टर – अंदाजे किंमत ७,००,००० रुपये
• लाल रंगाची ट्रॉली
• अंदाजे १ ब्रास रेती – ६,००० रुपये
एकूण जप्त मालमत्ता – ७,०६,००० रुपये.
पुढील तपासाचे सूत्र पो.ना. मंगेश खुळसाम (मो. ७९७२२९२१३६) यांच्या हाती देण्यात आले असून, ही कारवाई रेती माफियांना धोक्याचा इशारा मानली जात आहे.
राज्य शासनाच्या महसुलाला गळती घालणाऱ्या अशा व्यवसायावर कठोर अंमलबजावणी सुरूच राहणार असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

संकलन :- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *