मोटेड वुड आऊल (घुबड) यास जीवदान कोंढाळी-
कोंढाळी-
भारत व नेपाळचे सीमे वर प्रामुख्याने आढळणारा व
त्याच प्रजातीचा
अत्यंत देखणा घुबड २२आगस्ट चे सायंकाळी सहा चे सुमारास कोंढाळी वनपरिक्षेत्रातील कलकुही शिवरायांच्या शीवाना फार्म हाऊसवर समोरिल राज्य मार्ग २४७ चे कडे ला अज्ञात वाहनाने गंभीर जखमी अवस्थेत एक घुबड असल्याची माहिती कोंढाळी वन परिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांना मिळाली. हि माहिती मिळताच वन परीक्षेत्र अधिकारी कापडणे, तसेच दुसरे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय जाधव, वनरक्षक, योगेश नप्ते, वाहन चालक किशोर कुसळकर व तन्मय भांडेकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून गंभीर जखमी घुबडास ताब्यात घेतले व त्वरित पुढील उपचाराकरिता ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटर नागपूर येथे रात्री हलविले. त्यानंतर त्यावर हाड फ्रॅक्चर असल्याने टीटीसी येथील पशु शल्य चिकित्सक डॉक्टर राजेश फुलसुंगे, डॉक्टर रोहिणी टेंभुर्णे व सिद्धांत मोरे यांनी पिनिंग करून शस्त्रक्रिया केली व घुबडास जीवदान दिले . गंभीर जखमी वन्य जीवाचे उपचारादरम्यान महेश मोरे, प्रयाग गणराज, प्रवीण मानकर हजर होते. सदरची कारवाई डॉक्टर भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक, मनोज धनविजय, सहा. संरक्षक व कुंदन हाते मा.सदस्य राज्य वन्यजीव मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनात पार पडली
अशी माहिती कोंढाळी चे वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांनी दिली आहे.