मॉ काली मंदीरातील घट विसर्जनाने अश्विन नवरात्र उत्सव थाटात साजरा

कन्हान : – पावन कन्हान नदी काठावरील मॉ काली मंदीरात घटस्थापना करून भजन, देवी जस कार्यक्रमाने अश्विन नवरात्र उत्सवास सुरूवात करून नव दिवस विविध धार्मिक कार्यक्रम व कन्हान नदी पात्रात घट विसर्जन आणि प्रसाद वितरण करून नवरात्र उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
रविवार (दि.१०) ऑक्टोबंर २०२१ अश्विन शु. पंचमी ला सकाळी ९ वाजता सत्रापुर रोड कन्हान नदी काठावरील श्री महाकाली मंदीरात पावन नदीचे जल आणुन मॉ काली मातेचे स्नान, अभिषेक करून घटस्थापना करून सायंकाळी ७ वाजता आरती नंतर भजन व देवी जस गायन नवरात्र उत्सावास सुरूवात करण्यात आली. शासनाच्या नियमाची काटेकोर पणे पालन करून दररोज सकाळी व सायंकाळी आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून सोमवार (दि.१८) ऑक्टोंबर २०२१ ला सकाळी ९ वाजता मंदीरात जस गायन व आरती करून मंदीरातील घटाचे पावन कन्हान नदीच्या पात्रात भाविक भक्तानी घट विसर्जन करून मंदीरात उपस्थित भाविक भक्ताना प्रसाद वितरण करून अश्विन नवरात्र उत्सव थाटात साजरा करण्यात आला. नव दिवस नागपुर सह जिल्हयाच्या परिस रातील भाविक भक्तानी मॉ काली माते च्या दर्शनाचा लाभ घेऊन मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री महाकाली माता सेवा समिती सत्रापुर कन्हान चे पदाधिकारी, सदस्य आणि भाविक मंडळीने सहकार्य केले.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535