चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

मेंडकी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Summary

चंद्रपूर, दि. 23 ऑगस्ट : ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी परिसरात मुलभूत सोयी-सुविधेबरोबरच, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते आदी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. रामनगर टोली येथे ग्रामीण […]

चंद्रपूर, दि. 23 ऑगस्ट : ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी परिसरात मुलभूत सोयी-सुविधेबरोबरच, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते आदी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

रामनगर टोली येथे ग्रामीण भागातील मुलभूत सोयी-सुविधेअंतर्गत हनुमान मंदीर परिसराच्या आवारात सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्य प्रभाकर सेलोकर, स्मिता पारधी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, प.स.सदस्य ज्ञानेश्वर कायरकर, सरपंच मंगला इरपाते, हेमराज तिडके, मंगला लोणबळे, सुनील आंबटकर, राजेश कांबळे आदी उपस्थित होते.

रामनगर येथे 20 लक्ष रुपये खर्च करून सामाजिक सभागृह बांधण्यात येत आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, निधी मंजूर नसतांना केवळ नागरिकांना भूलथापा देण्यासाठी यापूर्वीच्या काळात तीन वेळा या सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र आम्ही पहिले निधीची तरतूद केली. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळविली आणि त्यानंतर भूमिपूजन केले. आता येथे लवकरच सभागृहाचे बांधकाम करून त्याचे लोकार्पण करण्यात येईल. जेणेकरून नागरिकांच्या सेवेत हे सामाजिक सभागृह उपयोगी पडेल. मेंडकी येथे 35 लक्ष रुपये खर्च करून मोठे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात येईल. तसेच येथील नागरिकांची सब-स्टेशनची मागणी पूर्ण करण्यात येईल. या परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

‘इको-टूरिझम’बाबत पालकमंत्री म्हणाले, ब्रम्हपूरी क्षेत्रात वाघांची संख्या ताडोबापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ‘इको – टूरिझम’ विकसीत करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ. पर्यावरणाच्या दृष्टीने वाघ महत्वाचा असला तरी मानवाचा जीवसुध्दा महत्वाचाच आहे. माणसाने वाघाला मारले तर मानवावर गुन्हा दाखल होतो. याबाबत कायदे कडक आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढून मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याबाबत वन विभागाला सुचना केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला विलास इखार, भावना इरपाते यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *