मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेची तयारी सुरू — मुंबईतील सर्व शाळांनी महाडीबीटीवर तत्काळ नोंदणी करावी : सहायक संचालक पाटील
Summary
मुंबई, १९ डिसेंबर २०२५ विमुक्त जाती–भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) व विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ ची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार […]
मुंबई, १९ डिसेंबर २०२५
विमुक्त जाती–भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) व विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ ची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुंबई शहरातील सर्व शाळांनी महाडीबीटी पोर्टलवर तातडीने नोंदणी करून संबंधित माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक रविकिरण पाटील यांनी केले आहे.
शाळांनी काय करावे?
– महाडीबीटी पोर्टलवरील लिंकद्वारे लॉगिन करून शाळेची नोंदणी करणे
– मुख्याध्यापकांसाठी उपलब्ध युजर आयडी Pre_SE27XXXXXXXXX_Principal व पासवर्ड Pass@123 वापरून प्रवेश
– शाळेचे प्रोफाइल, मुख्याध्यापक व लिपिक तपशील, विद्यार्थ्यांची वैयक्तिक-शैक्षणिक माहिती अद्ययावत करणे
विद्यार्थ्यांसाठी निर्देश
– पात्रतेनुसार संबंधित शिष्यवृत्ती योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक
– अर्ज प्रक्रियेदरम्यान तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी आल्यास त्या लेखी स्वरूपात नोंदवून कळवाव्यात किंवा
astdirmumcityvint@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा
शाळांची जबाबदारी अधोरेखित
विभागाच्या सूचनेनुसार, एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी
– मुख्याध्यापक व शाळा कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करणे
– अर्जांची वेळेत पूर्तता सुनिश्चित करणे
– विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांची अचूक पात्रता तपासणे
ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सातत्य, गुणवत्तापूर्ण शिकवणी व प्रोत्साहन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी पाऊल मानले जाते. विभागाने शाळांकडून सक्रिय सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
