BREAKING NEWS:
महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

मूल येथे आरक्षण कृती समितीची सभा संपन्न

Summary

संविधान हक्क व आरक्षण संपविण्याच्या षडयंत्राविरूध्द, समस्त अ.जाती, अ.जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, एमबीसी व ओबीसी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या व कामगारांच्या 88 संघटना मिळून आरक्षण हक्क कृती समितीचे माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात २६ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड जनआंदोलनिय मोर्चा नियोजित आहे. त्या […]

संविधान हक्क व आरक्षण संपविण्याच्या षडयंत्राविरूध्द, समस्त अ.जाती, अ.जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, एमबीसी व ओबीसी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या व कामगारांच्या 88 संघटना मिळून आरक्षण हक्क कृती समितीचे माध्यमातून संपूर्ण
महाराष्ट्रात २६ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड जनआंदोलनिय मोर्चा नियोजित आहे.

त्या संदर्भात दि. २१ जूनला मूल येथे मूलनिवासी स्टडी सेंटर मध्ये सहविचार सभा घेण्यात आली.
या सभेला कास्ट्राईब संघटना, आफ्रोट संघटना, स्वतंत्र मजूर संघटना, अ. जमाती संघटना, गोंडवाना समाज संघटना, SEM संघटना, समता परिषद, से. नि. कर्म. संघटना, विषमता निर्मुलन दल, आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
समता परिषदेचे पूर्व चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मा. प्रा. विजय लोनबले यांनी त्यांच्या संघटनेचा जनआंदोलनाला जाहिर पाठींबा देत सहभागी होण्याचे जाहिर केले.
मा. संपतजी कन्नाके साहेबांनी आरक्षण व त्याची महती सांगत गल्ली ते दिल्ली आंदोलन झाले पाहिजे ही ईच्छा व्यक्त करत मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
मा. प्रा. गुलाब मोरे यांनी आरक्षण संदर्भात आजपर्यंतच्या सरकारांचे नकारात्मक धोरणांवर प्रहार करित सर्वांना सहभागी होण्याचे सांगितले.
आफ्रोड संघटनेचे तालूका अध्यक्ष मा. प्रियदर्शन मडावी सर यांनी आमचे अकार्यक्षम संसदिय प्रतिनिधीवर नाराजी व्यक्त करत ते व त्यांची संघटना या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासित केले.
प्रमुख अथिती म्हणून मंचासिन मा. अॕड्. रविंद्र मोटघरे यांनी सरकारे व सुप्रिम कोर्ट यांच्या भूमिकांबाबत संशयात्मक पवित्रा घेत बहुजनांनी आरक्षण वाचविण्यासाठी एकजूटीने जनआंदोलन करण्यासाठी तयार असण्याचे आवाहन केले.
मा. टेंभरे साहेबांनी आरक्षणचा अंत होत आहे तेंव्हा अभि नही तो कभी नही… अशा निर्धाराने जनआंदोलनात सहभागी व्हावे यासाठी विचार मांडलेत.
या सहविचार सभेचे अध्यक्ष व राज्य निमंत्रक मा. राजकुमार जवादे यांनी जनआंदोलनाच्या नियोजनाबाबत समजावीत या आंदोदनात असलेल्या 13 मागण्यासंदर्भात समजावत सरकारच्या निषेधनार्थ आपण सर्वांनी आधिकाधिक संख्येने उपस्थित राहून जनआंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले.
सभेला मा. सिध्दार्थ बांबोळे, स्वतंत्र मजूर संघटनेचे अध्यक्ष मा. मोहूर्ले उपस्थित होते.

या सहविचार सभेचे संचालन मा. हिरालाल भडके सर तर
प्रास्तविक मा. सुनिल निमगडे सर यांनी केले आणि
सभेचे आभार मा. भारती कांबळे मॕडम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *