मुलीच्या पालकांसाठी आनंदाची बातमी! — राज्य सरकारकडून “लेक लाडकी योजना” अंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंतचा लाभ
भंडारा, दि. १३ ऑक्टोबर २०२५ —
महाराष्ट्रातील सर्व मुलींच्या पालकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील महायुती सरकारने “लेक लाडकी योजना” अंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी व पोषणासाठी तीन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ही योजना लागू करण्यात आली असून, याचे अर्ज कालपासून सुरू झाले आहेत.
या योजनेचा उद्देश मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि भविष्य सुरक्षित करणे हा आहे. विशेष म्हणजे —
मुलगी एक असो, दोन असोत किंवा तीन असोत — सर्व पालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
—
🔹 योजनेचे मुख्य लाभ :
मुलगी जन्मल्यानंतर ₹5,000 मदत
मुलगी शाळेत गेल्यावर ₹5,000
सहावीमध्ये गेल्यावर ₹8,000
आठवीमध्ये गेल्यावर ₹10,000
18 वर्षे पूर्ण झाल्यावर ₹75,000
एकूण लाभ – ₹1,01,000 प्रति मुलगी
तीन मुली असल्यास एकूण ₹3,03,000 पर्यंत मदत मिळू शकते.
—
🔹 कोण पात्र आहे?
1. महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक.
2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा कमी असावे.
3. 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठीच ही योजना लागू आहे.
4. पहिल्या मुलीसाठी तिसऱ्या हप्त्याच्या वेळी आणि दुसऱ्या मुलीसाठी दुसऱ्या हप्त्याच्या वेळी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
5. अंतिम लाभ (₹75,000) मिळवण्यासाठी मुलगी अविवाहित असणे गरजेचे आहे.
—
🔹 अर्ज प्रक्रिया :
अर्ज महिला व बालविकास विभागामार्फत भरायचा आहे.
फॉर्म चार पानांचा असून, तो अंगणवाडी केंद्रात उपलब्ध आहे किंवा ऑनलाईन लिंकद्वारे डाउनलोड करता येईल.
फॉर्ममध्ये लाभार्थी व पालकांची माहिती, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, पत्ता आणि बँक खाते तपशील भरावे लागतील.
बँक खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे.
—
🔹 आवश्यक कागदपत्रे :
मुलीचा जन्म दाखला
पालकांचे आधार कार्ड
बँक पासबुकची छायांकित प्रत
पिवळे/केशरी रेशन कार्ड
मतदान ओळखपत्राची छायांकित प्रत
शाळेचा बोनाफाईड दाखला (जर मुलगी शाळेत शिकत असेल)
कुटुंब नियोजन प्रमाणपत्र (अट लागू असल्यास)
अविवाहित असल्याचे स्वयंघोषण पत्र (18 वर्षानंतर लाभासाठी)
—
🔹 अर्ज कुठे जमा करायचा?
भरलेला अर्ज जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा.
सेविका कागदपत्रे तपासून पोचपावती देते.
सर्व कागदपत्रे अटेस्टेड (साक्षांकित) असणे आवश्यक आहे.
—
🔹 महत्त्वाच्या टिप्स:
अर्ज भरताना कोणतीही माहिती चुकीची भरल्यास लाभ नाकारला जाऊ शकतो.
प्रत्येक टप्प्यावर कागदपत्रे व शाळेचा दाखला वेळेवर सादर करणे आवश्यक आहे.
अर्जदारांनी फॉर्म सबमिट केल्यानंतर सेविकेकडून पोचपावती घेणे विसरू नये.
—
🔹 योजनेचा उद्देश :
राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली ही योजना मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि पालकांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे.
मुलगी जन्माला येणं ही जबाबदारी नव्हे, तर अभिमानाची बाब ठरावी, यासाठी “लेक लाडकी” योजना समाजात सकारात्मक बदल घडवणार आहे.
—
📍 अर्ज उपलब्ध ठिकाण:
महिला व बालविकास विभागाची अधिकृत वेबसाईट आणि स्थानिक अंगणवाडी केंद्रे.
🗓️ अर्जाची सुरुवात: कालपासून (12 ऑक्टोबर 2025)
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: स्थानिक अंगणवाडी केंद्र / ग्रामपंचायत कार्यालय
—
संकलनकर्ते:
✍️ अमर वासनिक
न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
—
