मुरमाडीत वीर धनुर्धारी एकलव्य जयंतीचा उत्साह! वधू-वर विवाह सोहळा अन् गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम
Summary
अजितदादा पवार फाऊंडेशनचे पंकजदादा तंतरपाळे यांच्या हस्ते उद्घाटन; ‘पुण्यात येणाऱ्या तरुणांसाठी माझे दरवाजे नेहमीच उघडे’ – तंतरपाळे यांची ग्वाही लाखांदूर (भंडारा): तालुक्यातील मुरमाडी येथे ‘वीर एकलव्य ढिवर/भोई समाज संघटने’च्या वतीने वीर धनुर्धारी एकलव्य जयंती अत्यंत अनोख्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी […]
अजितदादा पवार फाऊंडेशनचे पंकजदादा तंतरपाळे यांच्या हस्ते उद्घाटन; ‘पुण्यात येणाऱ्या तरुणांसाठी माझे दरवाजे नेहमीच उघडे’ – तंतरपाळे यांची ग्वाही
लाखांदूर (भंडारा):
तालुक्यातील मुरमाडी येथे ‘वीर एकलव्य ढिवर/भोई समाज संघटने’च्या वतीने वीर धनुर्धारी एकलव्य जयंती अत्यंत अनोख्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावर्षी जयंती सोहळ्याचे औचित्य साधून वधू-वर विवाह सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे या कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीचे स्वरूप प्राप्त झाले.
मिरवणुकीने झाली कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी वीर एकलव्य ढिवर/भोई समाज बांधवांनी गावातून काढलेल्या भव्य मिरवणूक रॅलीने झाली. त्यानंतर मुख्य सोहळ्याचे उद्घाटन अजितदादा पवार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पंकजदादा तंतरपाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत स्वागतगीताने करण्यात आले.
विद्यार्थी आणि मान्यवरांचा गौरव
याप्रसंगी इयत्ता ८ वीच्या ‘NMMS शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६’ मध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या मुरमाडी गावच्या कुमारी संचिता गणेश कापगते व आदित्य जालिंद्र कापगते या विद्यार्थ्यांचा पंकजदादा तंतरपाळे व सरपंच राजू गहाणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला.
तसेच, प्रमिला गोपाळराव तंतरपाळे, पंकजदादा तंतरपाळे, दीपक दादा भोई आणि मुनेश्वर कांबळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पुण्यात येणाऱ्या युवकांसाठी मदतीचा हात
उद्घाटक पंकजदादा तंतरपाळे यांनी आपल्या भाषणात भंडारा जिल्ह्याशी असलेले बंधुत्वाचे नाते अधोरेखित केले. “भंडारा जिल्ह्यातील जे तरुण पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात येतात, त्यांच्यासाठी माझ्या घराचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्याला डॉ. अविनाश नान्हे, संजय केवट (संचालक, मत्स्यजीवी संघ नवी दिल्ली), सविताताई मेश्राम, शालूताई कोल्हे, केशवजी कोल्हे, सुरेशजी खंगार, के.एन. नान्हे, संजनाताई वरखडे (उपसभापती, पं.स. लाखांदूर), ईश्वर हनवते (उपसरपंच), नीतूताई कांबळे (पोलीस पाटील), दुर्वास पुराम, कार्तिक वडस्कर यांच्यासह ढिवर/भोई समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेंद्र लंजे सर, प्रशांत लंजे व निकेश गहाणे यांनी केले, तर आभार ग्यानीराम कोल्हे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविकिरण कांबळे, चव्हाण शिवणकर, हेमराज दूधपचारे, दिगंबर कांबळे, विठ्ठल मेश्राम व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
वृत्त संकलन: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com
