BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

मुख्यमंत्री साहेब आता तरी !!!काटोल ला नविन जिल्हा घोषित करा……. सभापती- संजय डांगोरे 22 जिल्ह्यांच्या‌ प्रस्तावित यादीत “काटोल’ चे ही नांव समाविष्ट करण्यात यावे….. सभापती संजय डांगोरे” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळवा

Summary

कोंढाळी- (जि.नागपूर): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटोल जिल्हा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर गठित करण्यात आलेल्या समितीचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला होता. त्यात राज्यातील नवीन 22 जिल्हे व नवीन 49 तालुक्‍यांचा समावेश करण्यात आले आशी माहीत होती. मात्र, सर्वांत मोठी […]

कोंढाळी- (जि.नागपूर): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटोल जिल्हा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर गठित करण्यात आलेल्या समितीचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला होता. त्यात राज्यातील नवीन 22 जिल्हे व नवीन 49 तालुक्‍यांचा समावेश करण्यात आले आशी माहीत होती. मात्र, सर्वांत मोठी शोकांतिका ही आहे की, 1972 पासून काटोल जिल्हा व्हावा, अशी मागणी असताना22 जिल्ह्यांच्या यादीत काटोलचे नाव मात्र नसल्याचे सांगितले जाते.
*1972 पासून काटोल जिल्ह्याची मागणी*
2018 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हे निर्माण करण्याविषयी मुख्य सचिवांच्या नेतृत्वात एक अभ्यास समिती निर्माण करण्यात आली होती. त्यात समितीत वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव, विविध राजकीय पक्षाचे नेते, विभागीय आयुक्त यांचा सहभाग होता. समिती गठित होण्यापूर्वी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री रणजित देशमुख यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. काटोल जिल्हा व्हावा म्हणून काटोल जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष काटोल पंचायत समिती चे सभापती संजय डांगोरे यांच्या नेतृत्वात वेळोवेळी आंदोलने करण्यात आली होती. मात्र!! काटोल जिल्ह्याची केवळ घोषणाच राहिली.
काटोल बंद व नरखेड बंदही करण्यात आलेले होते. या साठी वेळोवेळी लोकप्रतिनिधी रणजित देशमुख, अनिल देशमुख, सुनील शिंदे, स्व. वीरेंद्र देशमुख, स्व. रमेश गुप्ता, सुनील केदार, आशीष देशमुख, भय्यासाहेब देशमुख आंदोलनाला पाठिंबा देत शासनदरबारी मागणी रेटून धरली होती.

जिल्हा परिषद, विविध नगर परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी काटोल जिल्हा व्हावा म्हणून बहुमताने ठराव घेऊन राज्य शासनाचे पाठविलेले आहेतच. अशी माहिती काटोल चे सभापती संजय डांगोरे यांनी दिली आहे.तर,काटोलचे माजी व ‌विद्यमान सावनेर चेआमदार डॉ. आशीष देशमुख यांनी तर२०१४ला ही आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काटोल जिल्ह्याची मागणी प्रकाशित केली होती. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे पालकमंत्री पदावर कार्यरत असतांना राज्य शासनाकडे काटोल जिल्हा व्हावा म्हणून पाठपुरावा ही केला होता . विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष स्व. ऍड. मधुकर किंमतकर यांनी तर विदर्भ विकास आराखड्यात काटोल जिल्ह्याची सूचना अग्रस्थानी केलेली होती.
सध्या 22 जिल्हा प्रक्रियेत विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातून खामगाव, यवतमाळ जिल्ह्यातून पुसद, अमरावती जिल्ह्यातून अचलपूर, भंडारा जिल्ह्यातून साकोली, चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर व गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी हे सहा जिल्हे होणार आहेत. मात्र, यात काटोलला यातून वगळण्यात आले हे समजन्यापलिकडचे आहे!.
*काटोल जिल्ह्याची मागणी का?*
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्‍याचे ठिकाणापासून नागपूर हे जिल्ह्याचे ठिकाण जवळपास 110 किलोमीटर आहे. कारंजा (घाडगे) व आष्टी (शहीद) हे तालुके जिल्हा ठिकाण वर्धापासून 120 किलोमीटर दूर अंतरावर आहे. काटोल तालुका झाल्यास सर्व तालुके 45 किलोमीटरच्या आत येईल. जिल्ह्याचे ठिकाण कमी अंतरावर असल्यास नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडणार नाही व वेळेची बचत होईल.

प्रस्तावित काटोल जिल्ह्याचे संभाव्य क्षेत्र
नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) व आष्टी (शहीद), अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका यांचा समावेश काटोल जिल्ह्यात असेल. यात जवळपास 950 गावांचा समावेश अपेक्षित आहे.

अनिल देशमुख गृह मंत्री पदी आले, आता जिल्हा होईल !अशी अपेक्षा होती,
आता काटोलचे आमदार अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असतांना. त्यांच्या राजकीय वजनाचा फायदा काटोल जिल्हानिर्मिती प्रक्रियेत नक्कीच होईल असे वाटले होते. मात्र याच दरम्यान जागतिक महामारी कोरोना सारख्या आजारा मुळे दोन अडिच वर्षे शासनाच्या वतीने अनेक निर्णय होऊ शकले नाही त्या नंतर खोट्या आरोपात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जवळ पास चौदा महिने जेल मध्ये रहावे लागले.जेल मधून सुटका झाल्यावर सरकार बदलले.त्या मुळे काटोल चे नांव नविन ‌जिल्ह्याचे यादीतून कां वगळण्यात आले? हे कळायला मार्ग नाही.
२०२४च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्याचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी काटोल‌ विधानसभा मतदारसंघा चे भा ज पा चे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांना निवडून द्या.सत्तेत पुन्हा भा ज पा प्रणीत सरकार सत्तेवर येणार आहे. चरणसिंग ठाकूर यांच्या प्रत्येक मागणीला सरकार म्हणून सहकार्य करू असे आश्वासक घोषणा काटोल विधानसभा निवडणुकीचे प्रचारात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केली होती. आता तर काटोल विधानसभेवर विशेष प्रेम करणारे राज्याचे राजस्व मंत्री व भावी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,यांचे सहकारी चरणसिंग ठाकूर यांना मतदारांनी काटोल विधानसभेवर मोठ्या फरकाने विजयी करून पाठविले आहे. अति विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी2018साली काटोल ला जिल्हा करण्यात येईल असे आस्वासक घोषणा ही केली होती.
खरे तर नवनिर्वाचित आमदार चरणसिंग ठाकूर हे विकासात्मक कामाचे व्यक्तीमत्व‌ म्हणून ‌त्यांची ओळख आहे.
आता मात्र आमदार चरणसिंग ठाकूर यांनी नविन जिल्हा निर्मितीत 22 नवीन जिल्ह्यांची घोषणा सरकर करत असेल तर राज्यात काटोल ला‌ नविन 23वा जिल्हा म्हणून जाहीर करून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे. अशी अपेक्षा काटोल जिल्हा निर्माण समीतीचे अध्यक्ष संजय डांगोरे यांनी केली आहे.काटोल चे कर्तव्यदक्ष जनप्रतिनिधी म्हणून आमदार चरणसिंग ठाकूर
त्यांच्या नेतृत्वावर आम्हा सर्वांचा प्रगाढ विश्वास आहे. त्यामुळे काटोल जिल्हा नक्की होईल, यात तिळमात्र शंका नाही.
असे दिनेश ठाकरे, प्रा. देविदास कठाणे यांनी सांगितले.
काटोल चे नव निर्वाचित आमदार चरण सिंह ठाकुर यांचे कडे कोंढाळी तालुका निर्माण करण्यासाठी निवेदन दिले असता त्यांनी सांगितले की काटोल जिल्हा ह्वावा या साठी आपण प्रयत्नशील आहो. काटोल जिल्हा नक्की बनेल, तेंव्हा कोंढाळीला तालुक्याचा दर्जा बहाल होईल असे काटोल येथील नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याचे वतीने आयोजित सत्कार समारंभाचे उत्तर देताना आमदार चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *