उस्मानाबाद कृषि हेडलाइन

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना

Summary

आपल्या जिल्ह्याची  शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी हमखास सिंचन सुविधा शेतकऱ्यांकडे असावी  लागते. त्यामुळे कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात […]

आपल्या जिल्ह्याची  शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी हमखास सिंचन सुविधा शेतकऱ्यांकडे असावी  लागते. त्यामुळे कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे.

या शेततळ्यातील पाण्याचा वापर करुन फळबाग, फुलशेती, भाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना सहज शक्य होते.

लाभार्थी पात्रता निकष :

अर्जदार शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदाराने यापूर्वी शासकीय योजनेतून शेततळे या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे :

जमीनीचा सात-बारा आणि 8-अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र आणि जातीचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

लाभार्थी निवड :

शेतकऱ्यांनी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळ CSC केंद्रावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करतेवेळी महाडीबीटी प्रणालीवर with inlet-outlet/without inlet-outlet यापैकी एका बाबीची निवड करावी. महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने निवड होईल.

आकारमान व अनुदान :

अ.क्र.आकारमान (मी.)इनलेट/आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅपसह शेततळे अनुदान रक्कम (रु.)इनलेट/आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅप विरहीत शेततळे अनुदान रक्कम (रु.)बाजु उतार 1:1बाजु उतार 1:1115X15X323,88118,621220X15X332,03426,774320X20X343,67838,417425X20X355,32150,061525X25X370,45565,194630X25X375,00075,000730X30X375,00075,000834X34X375,00075,000

विशेष सूचना :

शेततळ्याचे खोदकाम झाल्यानंतर प्लास्टीक अस्तरीकरण करण्यासाठी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा. प्लास्टीक अस्तरीकरण किंमतीच्या 50 टक्के अथवा 75 हजार रुपये याप्रमाणे अनुदान उपलब्ध आहे. आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे. तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, एकात्मिक फलोत्पादन अभियान (MIDH) व मग्रारोहयो या योजनांमधून फळबाग व इतर अनुषंगिक बाबीसाठी (कांदाचाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, प्लास्टीक मल्चिंग, यांत्रिकीकरण, प्रक्रिया उद्योग आदी) अनुदान उपलब्ध आहे.

लाभार्थ्यांची जबाबदारी :

कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहील. कार्यारंभ आदेश किंवा पूर्वसंमती पत्र मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील. अधिक माहितीकरिता कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *