मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत पाहणीसाठी शिक्षणाधिकार्यासह सरस्वती विद्यालयाला भेट
Summary
अर्जुनी/मोर= स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत तपासणी करिता गोंदिया जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी नामे,महेंद्र गजभिये व त्यांच्या समितीने भेट दिली.यात विस्तार अधिकारी डहाके, जिल्हा समन्वयक कुलदीपिका बोरकर, अर्जुनी/मोर.चे विस्तारधिकारी बेनीराम भानारकर,समन्वयक सत्यवान शहारे […]

अर्जुनी/मोर=
स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत तपासणी करिता गोंदिया जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी नामे,महेंद्र गजभिये व त्यांच्या समितीने भेट दिली.यात विस्तार अधिकारी डहाके, जिल्हा समन्वयक कुलदीपिका बोरकर, अर्जुनी/मोर.चे विस्तारधिकारी बेनीराम भानारकर,समन्वयक सत्यवान शहारे हे उपस्थित होते.सर्वप्रथम सर्व मान्यवरांना शाळेतील स्काऊट/गाईड व आर.एस.पी. पथकाने मानवंदना देऊन त्यांचे स्वागत केले.शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व मान्यवरांनी सर्वप्रथम शाळेतील यशोगाथा तसेच शालेय विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनवलेल्या राखींचे अवलोकन केले.परिणीता नाकाडे या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय प्रयोगाची माहिती सर्व मान्यवरांना समजावून सांगितले.त्यानंतर सर्व मान्यवरांनी शाळेतील वाचनालय,प्रयोगशाळा,अटल लॅब,संगणक प्रयोगशाळा तसेच शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याची माहिती घेऊन तपासणी केली.प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.प्रा.टोपेश बिसेन यांनी सदर जिल्हास्तरीय चमूला स्लाईड शो द्वारे संपूर्ण शाळेची माहिती दिली.सर्व मान्यवर चमूणी मध्यान सुट्टीत शालेय पोषण आहार ची तपासणी केली व विद्यार्थ्यांसमवेत मध्यान भोजन घेतले. मध्यांना भोजनाविषयी त्यांना संपूर्ण माहिती शाळेचे पर्यवेक्षक महेश पालीवाल यांनी दिली.चमूनी ग्रंथ प्रदर्शनीला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये सहभाग घेऊन यशस्वीतेसाठी प्रयत्न केल्याबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थाध्यक्ष बल्लभदासजी भुतडा, संस्था सचिव सर्वेश भुतडा, कोषाध्यक्ष जयप्रकाश भैय्या सर्व संस्था पदाधिकारी व प्राचार्य यांनी अभिनंदन केले.