मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात सरस्वती विद्यालयाचा गोंदिया जिल्ह्यात प्रथम क्रमांक सर्वत्र कौतुक
Summary
अर्जुनी मोर:- ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’उपक्रम अंतर्गत स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जिल्हास्तरावरील मूल्यांकनात अव्वल ठरले आहे.सदर मूल्यांकनात तीन निकषाअंतर्गत गुणांकन करण्यात आले.यात शाळेतील पायाभूत सुविधा, शासन ध्येयधोरण अंमलबजावणी व शैक्षणिक संपादणूक या बाबींचा अंतर्भाव होता. या तिन्ही निकषांमध्ये […]

अर्जुनी मोर:-
‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’उपक्रम अंतर्गत स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जिल्हास्तरावरील मूल्यांकनात अव्वल ठरले आहे.सदर मूल्यांकनात तीन निकषाअंतर्गत गुणांकन करण्यात आले.यात शाळेतील पायाभूत सुविधा, शासन ध्येयधोरण अंमलबजावणी व शैक्षणिक संपादणूक या बाबींचा अंतर्भाव होता. या तिन्ही निकषांमध्ये सरस्वती विद्यालय सर्वोच्च गुणांसह अव्वल ठरली. जिल्ह्यातून प्रथम आल्यामुळे विभागीय स्तरावरील मूल्यांकन १७ सप्टेंबर रोजी उल्हास नरड,शालेय विभाग शिक्षण उपसंचालक नागपूर, तसेच लोखंडे व कु.भडंग यांच्या चमूने विभागीय स्तरावरील मूल्यमापन करण्याकरिता शाळेला भेट दिली. विभागीय चमुचे शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्या छाया घाटे,पर्यवेक्षक महेश पालिवाल व शिक्षकांनी स्वागत केले. मान्यवरांनी सर्वप्रथम शाळेतील यशोगाथा तसेच शालेय विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेल्या राखींचे अवलोकन केले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी शाळेतील वाचनालय, प्रयोगशाळा,अटल टिंकरिंग लॅब,संगणक प्रयोगशाळा, तसेच शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याची माहिती घेऊन तपासणी केली. प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी ज्ञानात्मक संवाद साधला. प्रा. टोपेश बिसेन यांनी सदर विभागीय स्तरीय चमूला स्लाईड शो द्वारे संपूर्ण शाळेची माहिती दिली. चमुनी ग्रंथ प्रदर्शनीला भेट दिली. तसेच रसायनशास्त्र भौतिकशास्त्र व जीवशास्त्र प्रयोगशाळेला भेट दिली. रसायनशास्त्र प्रयोगशाळेची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती प्रा.टोपेश बिसेन यांनी दिली.तसेच वर्गातील अध्ययन कोपरा, स्काऊट/गाईड,आर.एस.पी.,एन.एस.एस.प्रहरी क्लब,तंबाखू मुक्त अभियान चळवळ, माता पालक संघ इत्यादी बाबींची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर प्रथम ठरल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बल्लभदासजी भुतडा,संस्थासचिव सर्वेश भुतडा व कोषाध्यक्ष जयप्रकाशजी भैया तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांनी शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्य छायाघाटे,पर्यवेक्षक महेश पालीवाल,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन करून त्यांना विभागीय स्तराकरीता शुभेच्छा दिल्या. जिल्हात सर्वत्र कौतुक केले जात आहे.