महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा

Summary

मुंबई, दि. 4 : धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सामाजिक क्रांतीचे सोनेरी पान आहे, अशा शब्दांत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध […]

मुंबई, दि. 4 : धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सामाजिक क्रांतीचे सोनेरी पान आहे, अशा शब्दांत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन केले आहे.

‘तथागतांचा मानव कल्याणाचा विचार आणि पंचशील अनुसरण यामध्ये समाज परिवर्तनाची महान शक्ती आहे. तथागतांच्या धम्मचक्र प्रवर्तनाचा संदेश घेऊनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यवधींच्या जीवनात नवी पहाट आणली. हा दिवस आपल्यासाठी सामाजिक क्रांतीचे सोनेरी पान आहे. या निमित्ताने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,’असेही मुख्यमंत्र्यांनी  शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *