मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Summary
मुंबई, दि. १७:- प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांना १३६ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन केले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, प्रबोधनकार ठाकरे यांनी पुरोगामित्वाचा जागर […]
मुंबई, दि. १७:- प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांना १३६ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन केले.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, प्रबोधनकार ठाकरे यांनी पुरोगामित्वाचा जागर केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते अग्रणी होते. सामाजिक चळवळींनाही त्यांनी बळ दिले. अनिष्ट प्रथा, चालीरीतींना कडाडून विरोध केला. सुधारणांचा आग्रह धरताना लेखणी,वाणी आणि कृतीशील संदेश देणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन’