मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. ७ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना आज येथे जयंतीनिमित्त अभिवादन केले.
वर्षा निवासस्थानी समिती सभागृहात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ब्रिटिशांविरुद्ध उठाव घडवून आणून राजे उमाजी नाईक यांनी ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ काढला होता. स्वातंत्र्यासाठी त्यांनी देहदंडही सोसला. अशा या भारतमातेच्या महान सुपुत्राला, राजे उमाजी नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.