मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीच्या शुभेच्छा ‘उत्सवात संयम राखूया, कोरोनाला हद्दपार करूया’
Summary
मुंबई, दि. 30 : भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. त्यांच्या या जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य आणि कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जन्माष्टमी नंतरच्या […]
मुंबई, दि. 30 : भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. त्यांच्या या जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य आणि कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जन्माष्टमी नंतरच्या दहीहंडी उत्सवातही संयम राखूया. कृष्णाला सखा सर्वोत्तम मानले जाते. ते सर्व प्राणिमात्रांची आणि जीवलगांची काळजी वाहतात. त्यांना नमन करताना आपणही सर्वांची काळजी घेवूया. घरात राहूनच आरोग्यदायी हंडीची लयलूट करूया. दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.