महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण

Summary

मुंबई, दि. 15 :  देशाच्या स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. त्यानंतर नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात महसूल पंधरवडा २०२४ ची सांगता […]

मुंबई, दि. 15 :  देशाच्या स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. त्यानंतर नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात महसूल पंधरवडा २०२४ ची सांगता करण्यात आली.

यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र सैनिक, नागरिक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी मुंबई शहर येथील उत्कृष्ट अधिकारी व  कर्मचारी यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2024 मधील पारितोषिक प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *