BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मुंबई महापालिकेत कामगार भरती करा अन्यथा कामगार आंदोलन करतील !.

Summary

पालिकेतील ५२,२२१ रिक्त शेड्युल्ड पदे भरली जात नाहीत तोपर्यंत रिक्त पदांच्या सापेक्ष घेण्यात आलेल्या १ हजार ८३२ हंगामी/ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडीत न करता त्यांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करावे अशी मागणी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’च्या वतीने करण्यात आली आहे. दोन वर्षांत […]

पालिकेतील ५२,२२१ रिक्त शेड्युल्ड पदे भरली जात नाहीत तोपर्यंत रिक्त पदांच्या सापेक्ष घेण्यात आलेल्या १ हजार ८३२ हंगामी/ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडीत न करता त्यांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करावे अशी मागणी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’च्या वतीने करण्यात आली आहे.
दोन वर्षांत हंगामी पदे कायम केली गेली नाहीत म्हणुन १८३२ हंगामी/ कंत्राटी पदे खंडीत करण्यात आली आहेत. वास्तविक, रिक्त पदांमुळे सेवेवर परिणाम होऊ नये म्हणुन रिक्त पदांच्या सापेक्ष हंगामी/ कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेण्यात आले होते. सदर हंगामी/कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा अशी मागणी युनियनच्या वतीने सातत्याने करण्यात येत होती. तथापि, प्रशासनाने उचित दखल घेतली नसल्यानेच वरील कर्मचारी वर्षानुवर्षे हंगामी/ कंत्राटी तत्वावर काम करीत राहीले.
अगोदरच मनुष्यबळाअभावी त्रस्त असलेल्या कर्मचारी वर्गाला, कर्मचारी भरती करुन, दिलासा देण्याऐवजी, त्यांच्या कामात थोडीफार मदत करणाऱ्या हंगामी / कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढुन टाकल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडणार आहे. खासकरुन, रुग्णालयीन सेवा देताना कर्मचारी व डॉक्टर तसेच रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये कायम संघर्ष संघर्ष होणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
पालिकेतील रिक्त ५२,२२१ शेड्युल्ड पदे भरली जात नाहीत तोपर्यंत रिक्त पदांच्या सापेक्ष घेतलेली व विखंडीत केलेली १८३२ हंगामी/ कंत्राटी पदे पुनर्जिवीत करावी व त्यासाठी अगोदरच्याच कंत्राटाचे नूतनीकरण करावे अशी मागणी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’ चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *