मुंबई महानगरपालिकेतील कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष मेळावा यशस्वीरित्या पार पडला

मुंबई, दि. १ जुलै २०२५ :
मुंबई महानगरपालिकेतील सफाई, परिवहन, रुग्णालये आणि इतर खात्यांतील कायम व कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या नोकर्या वाचविण्यासाठी “म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समिती” तर्फे आयोजित केलेला भव्य संघर्ष मेळावा आज यशस्वीरित्या पार पडला.
हा मेळावा आज मंगळवार, ०१ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह, राणीबाग, भायखळा येथे संपन्न झाला. या मेळाव्यास कामगार, कर्मचारी, महिला कामगार आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात महत्त्वाचे मुद्दे पुढे आले :
मनपा प्रशासनाकडून कामगारांचे कंत्राट रद्द करण्याच्या हालचालींना विरोध
सफाई व आरोग्य विभागातील कर्मचारी वाचविण्यासाठी ठोस भूमिका
कामगार एकजुटीचा निर्धार व मोठ्या लढ्याचा इशारा
संघर्ष समितीकडून प्रशासनाला कडक शब्दांत इशारा
मेळाव्यातील घोषणांनी परिसर दणाणून गेला. “लढेंगे भी और जितेंगे भी”, “हर जोर-जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है” अशा घोषणा देत कामगारांनी आपली एकजूट दाखवून दिली.
हा मेळावा कामगार चळवळीच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, लवकरच पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाईल, असे समितीच्या नेत्यांनी सांगितले.
कामगारांच्या हक्कासाठीचा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
राजकुमार खोब्रागडे
मुख्य संपादक तथा डायरेक्टर
९०२२२४४७६७