मुंबई मनपा कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे ७७वे अधिवेशन उत्साहात पार पडले माजी आयुक्त डॉ. जयराज फाटक यांच्या उपस्थितीने अधिवेशनास लाभली प्रतिष्ठा
Summary
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयातील CVTC सभागृहात मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे ७७वे अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाला विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, तसेच कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनाला माजी आयुक्त तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य […]
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयातील CVTC सभागृहात मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे ७७वे अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाला विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, तसेच कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या अधिवेशनाला माजी आयुक्त तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक डॉ. जयराज फाटक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे अधिवेशनास एक वेगळे औचित्य प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर डॉ. फाटक यांनी आपल्या भाषणात मनपा कर्मचार्यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेसाठी कर्मचारी संघटनांची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.
संघटनेचे जेष्ठ व अभ्यासू कामगार नेते अॅड. प्रकाश देवदास यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या संघटनात्मक कार्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांचे प्रभावी प्रतिनिधित्व सातत्याने केले जात असल्याचे अनेक वक्त्यांनी नमूद केले.
डॉ. संजय कांबळे-बापेरकर (उपाध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना) यांनी आपल्या भाषणात जाहीरपणे अॅड. प्रकाश देवदास सरांचे आभार मानले, तसेच संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अधिवेशनात मनपा कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन पुढील कार्ययोजनाही ठरविण्यात आली.

—
