BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मुंबई शहर मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवारी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

Summary

मुंबई, दि.26 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ ते दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ( Special Summary Revision Programme) जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सदर कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करणे / मतदारांचे नाव, पत्ता, फोटो यामध्ये दुरुस्ती करणे आणि मयत, दुबार […]

मुंबईदि.26 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ ते दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ( Special Summary Revision Programme) जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सदर कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करणे / मतदारांचे नावपत्ताफोटो यामध्ये दुरुस्ती करणे आणि मयतदुबार व स्थलांतरित मतदारांची वगळणी इ. बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदारमहिला आणि समाजातील वंचित घटकांतील मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी दि. २७ नोव्हेंबर२०२१ व दि. २८ नोव्हेंबर२०२१ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

            मुंबई जिल्ह्यातील नवमतदार दिव्यांग/अपंग व्यक्तीदेहविक्रय करणाऱ्या महिला तसेच वंचित घटकातील व्यक्ती किंवा ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांच्यासाठी  २७ व   २८ नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ११.००  ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी मतदारांनी जवळच्या मतदार मध्यवर्ती नोंदणी कार्यालयास भेट देवून आपले नाव नोंदणी करावी.

            मतदारांनी नाव नोंदणी करण्यासाठी जवळचे मध्यवर्ती मतदान केंद्र व पदनिर्देशित ठिकाणी भेट द्यावी मतदार केंद्रांची व पदनिर्देशित ठिकाणांची यादी electionmumbaicity.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन online पद्धतीने किंवा Voter Helpline App द्वारे मतदार यादीत आपले नाव नोंदणी करावेअसे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,  राजीव निवतकर  यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *