महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मुंबईतील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांनी पायाभूत सोयीसुविधा अनुदान योजनेसाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

Summary

मुंबई, दि. 25 : अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम  विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळांनी 10 […]

मुंबई, दि. 25 : अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम  विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळांनी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केले आहे.

सन २०२३-२४ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, अपंग शाळा, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी विहित अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ यांच्याकडे सादर करावा. विहित अर्जाचा नमुना  https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 022-22660167 या क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून त्रुटींची पूर्तता करून अंतिमरित्या पात्र प्रस्ताव शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *