मुंबईतील धक्कादायक प्रकार: फेसबुकवर मैत्री करत आर्थिक फसवणूक आणि नंतर अश्लील चाळे, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
मुंबईतील धक्कादायक प्रकार: फेसबुकवर मैत्री करत आर्थिक फसवणूक आणि नंतर अश्लील चाळे, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
महिलांशी फेसबुकवर मैत्री करत एका व्यक्तीने आर्थिक फसवणूक केली, असा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई 29 जुलै: दहिसर येथील परिसरातील महिलांशी फेसबुकवर मैत्री करत अभिजित वसंत सुर्वे या व्यक्तीने आर्थिक फसवणूक केली, असा आरोप करण्यात आला आहे. तसंच तक्रार करणाऱ्या महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्नही या भामट्या कडून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
महिलांच्या व्हॉट्सअॅपवर पीडित महिला वाईट आहे, असं सांगून बदनामी केली. तसंच वेळोवेळी अश्लील भाषेत संभाषण करून बदनामी करून तुझे कपडे काढलेले फोटो अपलोड करतो असे सांगून पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलं. तसंच पीडितेवर जातीयवाचक केस करेल अशी धमकी दिली.
आरोपी विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिस या भामट्याचा शोध घेत आहेत