मुंबईतील अतिवृष्टीमुळे कर्मचारी व कामगारांना बायोमेट्रिक हजेरीत सवलत देण्याची मागणी
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक नागरिक व कर्मचारी यांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दिनांक १५ ऑगस्ट २०२५ च्या रात्री ११ वाजल्यापासून ते १६ ऑगस्ट २०२५ च्या पहाटे ५ वाजेपर्यंत मुसळधार पावसाची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. महानगरपालिकेनेही नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
सफाई कामगार, मोटर लोडर, मालमत्ता व बाजार खाते तसेच इतर खात्यांतील अनेक कर्मचारी रोज सकाळी ६.३० वाजल्यापासून कर्तव्यावर उपस्थित राहतात. परंतु अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व इतर वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने कर्मचारी हजेरीच्या वेळेत थोडा उशीर करून पोहोचत आहेत.
यासंदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे मागणी केली आहे की,
कामगार व कर्मचारी यांना बायोमेट्रिक किंवा फेस रिडिंग हजेरीत सवलत देण्यात यावी, जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही.
ही विनंती बाबा कदम (अध्यक्ष) आणि डॉ. संजय कांबळे-बापेरकर (उपाध्यक्ष) यांनी केली आहे.
👉 कर्मचार्यांचे हित जपण्यासाठी हजेरी नियमांमध्ये लवचिकता दाखवण्याबाबतचा निर्णय महापालिकेकडून लवकरच अपेक्षित आहे.
—
