मिनिवाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह,व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना
मिनिवाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह,व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना
कोंढाळी वार्ताहार-दुर्गाप्रसाद पांडे
दरवर्षी प्रमाणे नजीकच्या मिनिवाडा येथे वसंत पंचमी पर्वावर अखंड हरिनाम सप्ताह दि 5 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या दरम्यान समपन्न होत आहे तर दि 7 फेब्रुवारी ला श्री विठ्ठलरुख्मिनी ,संत ज्ञानेश्वर महाराज,व संत तुकाराम महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व कळसारोहन सोहळा ह भ प गुरुवर्य मुखेकर बाबा शास्त्री व ह भ प गुरुवर्य सुरेश मानकर स्वामी महाराज यांच्या मंत्रोपचाराने नावयाने निर्माण झालेल्या भव्य मंदिरात होणार आहे 3 फेब्रुवारी ला विदर्भाची पंढरी धापेवाडा ते मिनिवाडा येथे मूर्तीचे पालखी दिंडी वाजत गाजत 4 फेब्रुवारीला मिनिवाडा येथे आगमन होणार आहे व 5 फेब्रुवारी पासून सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत काकड आरती,विष्णु शस्त्र पुराण ,ग्रंथराज पारायण दुपारी भजन कार्यक्रम,हरिपाठ,रोज रात्री 8ते 10ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाघ अकोला,ह भ प भीमरावजी कोठे हिंगणा,ह भ पगणेश फुलकुंटवार मुंबई,ह भ प सोपान काळपांडे,मूर्तिजापूर ह भ प नामदेव महाराज चव्हाण आळंदी, ह भ प पुरुषोत्तम बावसकर देहू, ह भ प नारायण महाराज शिंदे पुसद,ह भ प पद्माकर माहारज देशमुख अमरावती, तसेच दि 13 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 1 गोपालकल्याचे किर्तन पद्माकर महाराज देशमुख यांच्या वाणीतून होणार आहे विशेष मृदुगाचार्य ह भ प तेजेश महाराज मढवी मुंबई यांची उपस्थिती राहणार आहे ,व त्यानंतर महाप्रसाद वितरण होणार आहे.