BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मिझोरमचे मंत्री लालघिंगलोवा हमर यांनी घेतली कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची सदिच्छा भेट

Summary

मुंबई, दि. 16 : मिझोरमचे कामगार मंत्री लालघिंगलोवा हमर यांनी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची त्यांच्या मंत्रालयीन दालनात सदिच्छा भेट घेतली. या सदिच्छा भेटीत कामगार आयुक्त एच.पी.तुम्मोड तसेच मिझोरम राज्य क्रीडा परिषदेचे सचिव हेन्री सी लालरावकिमा, खासगी सचिव एच.लालरामेंगा उपस्थित […]

मुंबई, दि. 16 : मिझोरमचे कामगार मंत्री लालघिंगलोवा हमर यांनी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची त्यांच्या मंत्रालयीन दालनात सदिच्छा भेट घेतली.

या सदिच्छा भेटीत कामगार आयुक्त एच.पी.तुम्मोड तसेच मिझोरम राज्य क्रीडा परिषदेचे सचिव हेन्री सी लालरावकिमा, खासगी सचिव एच.लालरामेंगा उपस्थित होते.

या भेटीत कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी कामगार विभागामार्फत कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा आणि योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर इमारत बांधकाम करतांना शासनाला मिळणाऱ्या सेसबाबतची माहिती दिली. राज्यात पायाभूत विकासाची कामे तसेच सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पांची माहितीही मंत्री ॲड.फुंडकर यांनी दिली.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *