मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार
Summary
जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोल येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या […]

जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोल येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या महत्त्वाच्या बैठकीस गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी उपस्थित राहून जनतेचे प्रश्न व समस्या बाबत मोलाचे मुद्दे मांडले. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात त्यांनी ठोस सूचना मांडल्या तसेच जिल्ह्यातील विविध समस्या व मागण्या बाबतचे निवेदन मा. मुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांना सुपूर्द केले. याविषयी दखल घेऊन त्याचे उत्तर देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सहपालकमंत्री अँड. श्री.आशिष जयस्वाल, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र रामदास मसराम, आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र मा.धर्मरावबाबा आत्राम, आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सचिव व वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, सिंचन, कृषी, रोजगार, आदिवासी विकास व नक्षलग्रस्त भागातील समस्या यासारख्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा झाली.
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
प्रतिनिधि गडचिरोली
सौ. राखी मडावी
मो. 9158388003