मा.उध्दवजी ठाकरे व आदित्य जी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेणार ! – डॉ. संजय बापेरकर
Summary
प्रतिनिधी मुंबई डॅा.बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या हयातीत “शेंडी धारी व जान्हवे धारी हिंदुत्वाला” विरोध केला. त्यांचा वारसा जपणार्या आदरणीय उध्दवजी यांच्या “शेंडी-जाणव्याचे “हिंदुत्व” मान्य नाही या भूमिकेला लाखो आंबेडकरी अनुयायींना पाठींबा दिला आहे.त्यांच्या या भूमिकेमुळेच भविष्यात भाजपा […]
प्रतिनिधी मुंबई
डॅा.बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या हयातीत “शेंडी धारी व जान्हवे धारी हिंदुत्वाला” विरोध केला. त्यांचा वारसा जपणार्या आदरणीय उध्दवजी यांच्या “शेंडी-जाणव्याचे “हिंदुत्व” मान्य नाही या भूमिकेला लाखो आंबेडकरी अनुयायींना पाठींबा दिला आहे.त्यांच्या या भूमिकेमुळेच भविष्यात भाजपा च्या गुलामीतुन देश वाचणार आहे,म्हणुनच आपण “शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे” पक्षात सामील झाल्याचे “आम आदमी पार्टी चे मा.प्रवक्ता व कामगार नेते डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी म्हटले आहे.
आम आदमी पार्टी चा “प्रवक्ता”म्हणून त्या पक्षाची भूमिका आपण योग्यप्रकारे मांडली होती.
भाजपा मध्ये अलिकडेच दाखल झालेले, एका उपमुख्यमंत्र्याची मर्जी सांभाळण्यासाठी आदरणीय उध्दवजी ,व आदित्य जी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात, त्यांचा योग्य समाचार घेण्याचे काम निश्चितपणे करु असे हि डॉ. बापेरकर यांनी पक्षप्रवेशानंतर बोलताना स्पष्ट केले.