क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

माहीतीच्या अधिकारात डीवाईएसपी डॉ अशोक बागुल यांची प्रतिबंधात्मक कार्यवाही. ठाणेदार अभिजित पाटील यांच्यामुळे वरठी येथील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्या मार्गावर

Summary

प्रतिनिधी भंडारा         पोलीस योद्धा न्युज नेटवर्क मध्ये दिनांक ३१-०७-२०२३ रोजी प्रकाशित बातमी नुसार माहिती अधिकार कार्यकर्ते अमर भालचंद्र वासनिक यांना सुनावणी पूर्वी डॉ अशोक बागुल यांनी स्वतःच्या कार्यालयात बोलावून अश्लील शिवीगाळ केली होती व विविध कलमान्वये […]

प्रतिनिधी भंडारा
        पोलीस योद्धा न्युज नेटवर्क मध्ये दिनांक ३१-०७-२०२३ रोजी प्रकाशित बातमी नुसार माहिती अधिकार कार्यकर्ते अमर भालचंद्र वासनिक यांना सुनावणी पूर्वी डॉ अशोक बागुल यांनी स्वतःच्या कार्यालयात बोलावून अश्लील शिवीगाळ केली होती व विविध कलमान्वये अमर वासनिक यांना अटक करण्याची धमकी दिली होती.
         दिनांक १४-०७-२०२३ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते अमर वासनिक यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत जप्त करण्यात आलेल्या वाहनां विषयी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. वरठी पोलिसांनी माहिती निरंक दिली होती त्यावर दिनांक १३-०८-२०२३ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते अमर वासनिक यांनी प्रथम अपील केले यावर मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांनी माहितीचे निरीक्षण करण्याविषयी आदेश काढला होता. प्रस्तुत जजमेंट लिखित स्वरूपात प्राप्त होऊनसुद्धा ठाणेदार अभिजित पाटील यांनी अमर वासनिक यांनी माहितीचे निरीक्षण करू नये म्हणून गांजा, ब्राऊन शुगर तस्करांच्या हातून तसेच क्रिमिनल लोकांच्या हातून माहिती अधिकार कार्यकर्ते अमर वासनिक यांना मानसिक त्रास देणे चालू केले. गांजा तस्करांच्या हातून अमर वासनिक तसेच अमर वासनिक यांचे वडील श्री भालचंद्र कवडू वासनिक यांना मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक क्षती पोहोचवली. याउलट वरठी येथील ठाणेदार अभिजित पाटील यांनी अमर वासनिक यांनी माहितीच्या अधिकारात माहिती उचलू नये म्हणून गांजा तस्करांना फिर्यादी बनवून अमर भालचंद्र वासनिक तसेच भालचंद्र कवडू वासनिक यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले. व दिनांक १४-११-२०२३ रोजी रात्री १०:२० वाजता गांजा तस्करांच्या हातून अमर वासनिक यांच्या घरावर हमला चढवला. अमर वासनिक तसेच अमर वासनिक यांचे वडील भालचंद्र वासनिक हे दहशतीत असून अभिजित पाटील यांचे पोलीस कर्मचारी अमर वासनिक यांना वारंवार फोन करून धमकवत असतात.
         अमर वासनिक हे पत्रकार असल्याने प्रस्तुत प्रकरणाचा तपास राजपत्रित अधिकारी यांच्या हातून करण्यात यावा व अभिजित पाटील तसेच डॉ अशोक बागुल यांच्यावर एफ आय आर ची नोंद करण्यात यावी तसेच एफ आय आर नोंदविताना माहिती अधिकार कार्यकर्ते अमर वासनिक यांच्यावर मानसिक दबाव टाकू नये अशी मागणी अमर वासनिक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *