हेडलाइन

माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या केंद्रीय संचार ब्युरो अंतर्गत अटल भूजल योजनेच्या कलापथक कार्यक्रमाचे सादरीकरण

Summary

माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या केंद्रीय संचार ब्युरो अंतर्गत अटल भूजल योजनेच्या कलापथक कार्यक्रमाचे सादरीकरण   कलापथकाचे माध्यमातून पाणी वाचवा अभीयान ची माहिती   वार्ताहर- कोंढाळी :- वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) कार्यालयाकडून अटल भूजल […]

माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या केंद्रीय संचार ब्युरो अंतर्गत अटल भूजल योजनेच्या कलापथक कार्यक्रमाचे सादरीकरण

 

कलापथकाचे माध्यमातून पाणी वाचवा अभीयान ची माहिती

 

वार्ताहर- कोंढाळी :-

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) कार्यालयाकडून अटल भूजल योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील काटोल मधील १०८ व नरखेड मधिल १४ असे एकूण १२२ गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विविध विभागाच्या सहकार्याने जलसंधारणाच्या उपाय योजना राबविण्यात येत असून लोकसहभागाद्वारे समाजाच्या पाणी बचतीच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी देखिल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा काम करत आहे. याअनुषंगानेच माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या केंद्रीय संचार ब्युरो अंतर्गत राज्यात अटल भूजल योजनेंतर्गत लोककलेद्वारे जनजागृती अभियान २०२२ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने रंगधून कला मंच नागपूर चे समिर दांडले व कलासंच यांच्या कलासमुहाद्वारे काटोल तालुक्यातील कोंढाळी येथे जनजागृती विषयक कलापथक सादरीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कलापथक मनोरंजनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना भूजल बचतीचे महत्व व त्यावरील उपाय योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच ग्रामपंचायतीच्या जलसुरक्षा आराखड्यातील विविध विभागाच्या योजनांच्या अभिसरणातून होणारी जलसंधारणाची विविध कामे, शेतकरी बांधवांसाठी कमी पाण्यातील पिक पद्धती, ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करणेबाबत माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रम सरपंच केशव धुर्वे, यांचे अध्यक्षतेखाली व उपसरपंच स्वप्निल सिंह व्यास यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम कोंढाळी येथिल बाजार चौकात घेण्यात आला। या प्रसंगी ग्रामिण व नागरी भागातील जास्तीत जास्त गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, व अटल भूजल योजनेअंतर्गत जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे प्रकाश बहादे, माहिती शिक्षण संवाद तज्ञ तसेच क्षेत्रीय स्तरावर काम करणारी जिल्हा अंमलबजावणी भागिदार संस्थाचे भास्कर गाडरे, समुदाय संघटक यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *