मावळातील पवनानगर भागात धुक्याचे साम्राज्य
पत्रकार – सागर घोडके
पुणे मावळ
मावळातील पवनानगर भागात धुक्याचे साम्राज्य
मावळ (पवनानगर) – पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील अनेक गावांना ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा लाभला आहे . तसेच पवनानगर हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. तेथे पवना धरण, किल्ले, डोंगर, नद्या, व निसर्गरम्य परिसर आहे. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात.
पहाटे पडलेल्या धुक्यामुळे थोड्या अंतरावरील काही दिसत नव्हते.
हिवाळा सुरू असल्याने येथील हवामान थंड असते. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे लोणावळा, खंडाळा हे पर्यटक स्थळे आहे. हिवाळ्यात अनेक लोकांची व्यायाम करायला सुरुवात होते कारण हे वातावरण शरीरासाठी अनुकूल असते.
क्रिसमस साजरी करण्यासाठी अालेल्या पर्यटकांनी पहाटे पडलेल्या धोक्यांचा अनुभव व आनंद घेतला. सकाळी वाहन चालकास वाहने हळू चालवावी लागली. धुके सकाळी १० वाजेपर्यंत होते.